सामाजिक दायित्व भावनेतून समाजाप्रती आस्था जपणे गरजेचे – व्याख्याते लक्ष्मण जाधव

गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

पुणे : दि १५; नैतिक विचारांनी देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची खरी जबाबदारी ही शिक्षकांची असते.
विद्यार्थ्यांना समाज प्रवाहातील जाणिवांच आणि उणिवांच वेळोवेळी भान करून देत त्यांच्या मनात सामाजिक आस्था निर्माण करणे गरजेचे अशी भावना लक्ष्मण जाधव यांनी गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम सोहळ्यात व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर व्याख्याते लक्ष्मण जाधव, पञकार विशाल सातपुते,सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव,शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार यादी मान्यवर उपस्थित होते.
भारतमातेच्या प्रतिमाचे पुजन करत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगीत गायन, समुहनृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली.चिञकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला‌.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक रणजित बोञे शिक्षिका गीतांजली कांबळे, दिपाली गावडे, मंदाकिनी बलकवडे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विशाल चव्हाण यांनी केले.

Leave A Reply

Translate »