विवाहबाह्य संबंधांचे पुरावे गोळा करण्यासाठी खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीजची मदत घेण्याकडे कल वाढला..

पुणे: पती पत्नीच्या नात्यामध्ये मोबाईल आणि सोशल मीडिया दुरावा निर्माण करत असल्याबरोबर विवाह बाह्य संबंध असल्याचा संशय वाढत आहे. घटस्फोट घेण्यासाठी केवळ संशय घेण्यापेक्षा हाती ठोस पुरावे असावेत असे जोडीदाराला वाटत असल्यामुळे विवाहबाह्य संबंधांचे पुरावे गोळा करण्यासाठी खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीजची मदत घेण्याकडे कल वाढला असल्याचे स्विफ्ट डिटेक्टीव्ह एजन्सीजच्या संचालिका प्रिया काकडे यांनी सांगितले.
प्रिया काकडे म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यात विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोटापर्यंत पोहचणार्‍यांचे प्रमाण साधारणत: ५० टक्क्यांपर्यंत आहे. लग्न झाल्यावर अवघ्या एक ते दोन महिन्यांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी आमची मदत घेतली जाते आहे. काही केसेसचे जर अवलोकन केले तर आयटी क्षेत्र असो कि बँकिंग टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात पती-पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. नोकरीमुळे एकमेकांना वेळ देणे कमी झाल्यामुळे भावनिक गोष्टींमध्ये भागीदार शोधला जातो आणि पुढे हे संबंध वाढतात. जोडीदाराशी बांधिलकी असलीच पाहिजे हा विचार तरुणांमध्ये बदलताना दिसतो. त्याच्यात किंवा तिच्यात आता तितकासा रस नाही, समाधान, आनंद देणारे दुसरे कोणीतरी आहे, हा आता तरुणांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. त्यातच सोशल मीडियाचा अतिवापर आणि इतर ठिकाणी भावनिक गुंतवणूक होऊन विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. अशावेळी जोडीदार फक्त एकमेकांवर आरोप करत राहतात. घटस्फोट घेण्यासाठी केवळ संशय असण्यापेक्षा पुरावे गोळा करण्यात जोडीदार खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीजची मदत घेतात. अशावेळी गोष्टी टोकाला गेल्या की मग घटस्फोटाचा निर्णय घेतात.

एका डॉक्टर दाम्पत्याचा घटस्फोटाचा अनुभव सांगताना प्रिया काकडे म्हणाल्या की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून पत्नी पतीकडे दुर्लक्ष करीत होती नंतर मुलाचा जन्म झाल्यापासून त्याचे संगोपन करायला टाळाटाळ करायला लागली. रात्री उशिरापर्यंत बायको सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायची, रात्रभर मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली हॉस्पिटलला जाण्याच्या बहाण्याने बायकोच्या घराबाहेर जाण्याने नवरा हैराण झाला होता. तिला जाब विचारला गेले की मानसिक छळ, शारीरिक छळ, हुंडाबळीची केस टाकेन अशा धमक्या पत्नीकडून सासरच्यांना सारख्या मिळायच्या. त्यामुळे शेवटी तिचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागताच त्यांनी खाजगी डिटेक्टिव्हची मदत घेत पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात पुरावे सादर करून घटस्फोट घेतला. तिच्या वागण्याचे विचित्र पुरावे असल्याने तिला पोटगी आणि मुलाचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे उच्च शिक्षित आणि श्रीमंत वर्गामध्ये देखील याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत असल्याचे काकडे म्हणाल्या.

स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्वेस्टीगेशन बद्दल –
कॉर्पोरेट केसेस, विवाहबाह्य संबंध, आर्थिक फसवणूक सारख्या केसेसमध्ये न्यायालयीन बाबींसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्वेस्टीगेशन एजेंसी २००६ पासून कार्यरत असून आजतागायत त्यांनी १०२० केसेस यशस्वीरित्या हाताळल्या आहेत.

Leave A Reply

Translate »