अबब…पोटातून काढला ४ किलोचा प्लीहा
कोथरुड हॉस्पिटलचे प्रसिद्ध सर्जन डॉ. गुंडेवार यांनी रूग्णाला दिले जीवनदान

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सूपर मेजर ऑपरेशन करून एका ४६ वर्षीय रुग्णाच्या पोटातून चक्क ४ किलो वजनाचा जीवघेणा प्लीहा काढून जीवनदान दिले. ही किमया पुणे येथील अत्याधुनिक सुविधांनी सज्ज कोथरूड हॉस्पिटलचे सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार यांच्या टीम ने केले आहे.
अजय अनंत बेंद्रे (४६ वर्ष) नावाचा पुरूष ८ महिन्यांपासून पोटदुखीमुळे लहान मोठ्या हॉस्पिटलमध्ये भटकत होते. पण वेदना कमी न होत्या त्या वाढू लागल्या. त्यामुळे पुणे येथील कोथरूड हॉस्पिटलमध्ये ते भर्ती झाले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर पोटात प्लीहा असल्याचे समोर आले. ज्यात प्लीहाचा सामान्य आकार आणि वजन कितीतरी पटीने वाढले होते. साधारणपणे प्लीहाचा साधारण आकार १२ सेमी ५ सेमी पर्यंत असतो. परंतु हा ७ सेमीपेक्षा जास्त वाढला होता. त्यामुळे प्लीहाने पोटाच्या आतील अर्ध्याहून अधिक भाग झाकून टाकला होता. आकार वाढल्याने त्याचे वजन ४ किलो पेक्षा जास्त झाले होते.
या संदर्भात डॉ. राजेंद्र गुंडावार म्हणाले, साधारणपणे प्लीहाचे वजन ७० ते ८० ग्रॅम असते. पण या रूग्णाच्या बेंबीच्या बाजूला ४ किलो वजनाचा प्लीहा होता. रूग्णाच्या ऑपरेशनच्या वेळी रक्तवाहिनी धमणी बांधली त्यामुळे रक्त प्रवाह कमी झाला येथे साठलेले रक्त बाहेर काढले. १२ इंचाचे छिद्र करून ४ किलोचा प्लीहा बाहेर काढला. अजय बेंद्रे याच्या शरीरात प्लीहा खूप वाढला होता. ज्यामुळे ती आतडे आणि बेंबीला लागून होती. प्लीहा मोठा असल्याने त्याचे दुष्परिणाम म्हणजे अनेमीया, पांढर्‍या पेशी कमी होणे आणि प्लीहा फुटण्याचा अधिक धोका होता. शस्त्रक्रियेला आणखी थोडा विलंब झाला असता तर ती जीवघेणी ठरू शकली असती. या ऑपरेशनला चार तास लागून रुग्णाला ब्लड देण्याची आवश्यकता भासली नाही.
शस्त्रक्रिया करतांना डॉ. राजेंद्र गुंडावार यांच्या टीममध्ये डॉ. तुषार दाते, डॉ. दिव्यानी, डॉ. दिप्ती पोफळे आणि डॉ. राजेंद्र मिटकर हे होेते.
या संदर्भात डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले, ३५ वर्षापासून हजारों ऑपरेशन करणारे डॉ. गुंडावार यांनी ही अत्यंत जटील शस्त्रक्रिया केली आहे. प्लीहा वाढण्याचे कारण म्हणजे संसर्ग, मलेरिया, टायफॉइड, एचआईव्ही आणि टीबी आहे. तसेच यकृतचे आजार उदाः पोर्टल हायपरटेंशन, कॅन्सर, अ‍ॅटो इम्यून आजार व मेटाबोलीक आजार असतात. देशातील १२.५ टक्के लोक प्लीहाने त्रस्त आहेत. हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे.
लाखात एक केस
डॉ. राजेंद्र गुंडावार म्हणाले , प्लीहा काढण्याचे ऑपरेशन सामान्य आहे. जेव्हा एखाद्या अपघातात किंवा घटनेत कोणी जखमी होते आणि नंतर ऑपरेशन केले जाते, ज्यामध्ये प्लीहा विखुरलेला असतो. अशा मोठ्या आणि जड प्लीहासाठी ऑपरेशन आहेत. रुग्ण अजयसारखे प्रकरणे लाखात एकात आढळतात.
प्लीहा वाढण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये प्रामुख्योन रोग दीर्घकाळ शरीरात राहणे, मलेरिया, दूषित ठिकाणी राहणे, तसेच इतर कारणे अजयच्या बाबतीत स्पष्ट होऊ शकले नाहीत.

प्लीहाचे कार्यः
डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी सांगितले की, मानवी शरीरात उजव्या बाजूला यकृत आणि डाव्य बाजूला प्लीहा असते. शरीराच्या आत खसच तयार करून रोगप्रतिकार शक्ती प्रदान करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. दुसरे काम म्हणजे रक्तातील बॅक्टेरिया आणि अनावश्यक लोह बाहेर काढणे आणि संसर्गापासून संरक्षण करणे हे आहे.

००००००००००००००००००००००००००

Leave A Reply

Translate »