व्यसनमुक्त भारतासाठी युवा वंदन बाईक रॅली

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा पुढाकार

पुणे : राजमाता जिजाऊ साहेब आणि भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्त व सशक्त भारतासाठी पुण्यात युवा वंदन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांच्या पुढाकारातून ही रॅली निघाली. भारत माता की जय, वंदे मातरम, व्यसनमुक्त भारत-सशक्त भारत, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. देशभर स्वच्छता जनजागृती करणारे विक्रांत सिंग यांनी स्वच्छतेचे व व्यसनमुक्तीचे महत्व सांगितले. सातारा रस्त्याने स्वारगेट-टिळक रोड-अप्पा बळवंत चौक-शनिवारवाडा मार्गे लाल महालापर्यंत ही रॅली निघाली. लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून रॅलीची सांगता झाली.

लाल महाल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमलताई व्यवहारे, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब आमराळे, युवानेते पुष्कर आबनावे, कुणाल माने, इरफान शेख, शिक्षक धोंडीबा तरटे, मंगला धुमाळ, अजित जाधव, ओंकार साबळे, प्रथमेश दिवेकर, पूर्व खानविलकर, प्राजक्ता ठकार यांच्यासह युवक काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी व्यसनमुक्त भारताचा संकल्प करत विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी केलेले कार्य, तसेच व्यसनमुक्त भारताचे महत्त्व प्रथमेश आबनावे यांनी विशद केले.

Leave A Reply

Translate »