शेतकरी हिताचा शेतीपूरक उत्पादक “अ‍ॅग्रीशिल्ड”

पुणे:कित्येकांचा स्वतःच आस्तित्व शोधण्याचा तसा संघर्ष सुरूच असतो काही यशस्वी होतात तर काही माणसांच्या गर्दीत विरून जातात , सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उंडेगावचे “शांतीश्वर विलासराव पाटील “ विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर १९९९ साली पुणे गाठले , घरची हालाखीची परिस्थिती असल्याने एका केमिकल कंपनीमध्ये शिकाऊ लॅब केमिस्ट म्हणून दर महिन्याला १६०० रुपयांच्या पगाराची नोकरी सुरू केली.
नौकरी सुरू असतानाच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.
नौकरीच्या २१ वर्षाच्या कार्यकाळात कामातील सातत्य प्रमाणिकपणाच्या जोरावर तब्बल सहा वेळा पदोउन्नती होऊन सहाय्यक महाव्यवस्थापक पदाचा राजीनामा देऊन २०२० साली कोरोना सारख्या महामारी मध्ये मंदीत संधी शोधत शेती निगडित “शिल्ड लाईफ सायन्सेस अँड रेझिन्स प्रा लिमिटेड “ कंपनीची पुण्यातील भोसरी येथे सुरुवात करत व्यावसायिक क्षेत्रात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.
२१ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने आणि सोबत पत्नी प्रतिभा पाटील यांच्या साथीने आर्थिक दृष्ट्या पाठबळ नसताना व्यावसायिक क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करत कंपनीच्या माध्यमातून सेवेचा दर्जा उंचावत अल्पावधीतच ही कंपनी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढीची गरज ओळखून
दर्जेदार विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रवे निर्माण करत आहे.
गुणवत्तापूर्वक उत्पादने,कमीत कमी किमतीत आणि विक्री पश्चात्य तत्पर सेवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणारी कंपनी म्हणून “शिल्ड लाईफ सायन्सेस अँड रेझिन्स प्रा लिमिटेडने
नावलौकिक मिळविला आहे.
कृषी क्षेत्रात केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नातून अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत देश स्वयंपूर्ण झाला आहे.मागील तीन दशकात तर शेतीच्या तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल होत आहे. देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती, निलक्रांती घडून आल्या. एका बाजूला प्रगतीचे हे लक्षवेधी टप्पे गाठले असले तरी शेती उत्पादन वाढीच्या प्रयत्नात किटक व रोग नाशके, तण नाशके यांचा अधिक वापर ,
जमिनीची धूप व निकसपणा, माती व पाण्याचे प्रदूषण, किटकांची वाढती प्रतिकारशक्ती,अनेक विविध मूलद्रव्यांचा असंतुलितपणा, क्षारपड आणि चोपण – पाणथळ जमिनीचे वाढते प्रमाण, निसर्गाचा असमतोल आणि प्रदुषण अशा अनेक समस्या सध्या निर्माण झाल्या आहेत.
अशात कुठल्याही पिकांना योग्य वाढीसाठी आवश्यक प्रमाणात अन्नद्रव्ये लागतात.ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमार्फत जलद आणि सोप्या पद्धतीने देता येतात.
शेतकरी विद्राव्य खते फवारणीच्या माध्यमातून किंवा ठिबकद्वारे पिकाला देत असतात. विद्राव्य खते पिकाला लवकर लागू होत असल्याने विद्राव्य खतांमुळे उत्पादन वाढ.तसेच कमी खर्चात भरपूर फायदा विद्राव्य खताच्या फवारणी मुळे होत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत,पिकांचा दर्जा आणि उत्पादनात भरघोस वाढ होत आहे.
सकस जमिनीत एक दाणा पेरला तर बदल्यात हजारो दाण्यांचं दान पदरात पडतं माञ विविध कारणांमुळे जमिनीचा कस कमी होताना दिसत असला,नापिकी वाढत असली आणि पिकांखालील क्षेत्र कमी होत असलं तरी योग्य प्रमाणात आणि हवा तेव्हा पाऊस पडला , वेळेत “अ‍ॅग्रीशिल्ड”
खतांची मात्रा मिळाली आणि निसर्गाने साथ दिली तर देशात विक्रमी धान्योत्पादन होऊ शकते.

शिल्ड लाईफ सायन्सेस अँड रेझिन्स प्रा लिमिटेडने दोन वर्षाच्या कालावधीत १५ जिल्ह्यामध्ये व्यवसाय करत ६० लाखची वार्षिक उलाढाल केली आहे. आणि २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण ३६ जिल्ह्यामध्ये आणि २०२५ पर्यंत गुजरात आणि कर्नाटक मध्ये व्यवसाय विस्तारित करण्याचा मानस शांतीश्वर पाटील यांचा आहे.
कंपनीच्या “अ‍ॅग्रीशिल्ड ” ब्रँडने बाजारपेठेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फवारणीसाठी आणि मातीत टाकण्यासाठी सेंद्रिय सूक्ष्म अन्नद्रव्ये, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये,विद्राव्य खताची मालिका , तणनाशक,कीटकनाशक दर्जेदार स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
शिल्ड लाईफसायन्सेस अँड रेझिन्स प्रा लिमिटेड ही कंपनी ISO 9001:2015 नामांकन , G2,G3 , MRC आणि DRC प्रमाणित कंपनी आहे.

@प्रतिक्रिया@

“इच्छाशक्ती, संयम,कष्ट करण्याची तयारी आणि त्याला प्रमाणिकतेची जोड मिळाली की संशोधनातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग अधिक सुखकर होतो.
लहानपणापासूनच शेतीची गोडी मनामनात रुजली आहे.
या मातीसाठी उतराई होण हे कायमच वाटत असल्याने शेतीपूरक शेतकऱ्यांच्या हितासाठी ॲग्रीशील्डची निर्मिती केली. शेतकरी टिकेल तरच शेत पिकेल
शेती,माती, आणि आपुलकीची नाती कायमच विश्वासाने जपत आहे , शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण शेतीविषयक औषधे देणे आणि शेतकऱ्यांच्या भरघोस उत्पादन वाढीच्या दृष्टीने कंपनी भविष्यात कार्यरत राहील. “

शांतीश्वर पाटील ,
व्यवस्थापकीय संचालक , शिल्ड लाईफसायन्सेस अँड रेझिन्स प्रा लिमिटेड भोसरी , पुणे.
संपर्क क्रमांक -९०२१३४२९०१
ईमेल – shantishwar.patil@shieldlifesciences.com
वेबसाईट :
www.shieldlifesciences.com

@ग्राहक प्रतिक्रिया@

शेतीच्या उत्पादनात वाढीसाठी कायमच चिंतेत असायचो माञ गेली दोन वर्षांपासून सातत्याने शिल्ड लाईफसायन्सेसच्या
अ‍ॅग्रीशिल्ड ब्रँडचे प्रॉडक्ट्स मी वापरत असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दर्जेदार उत्पादनाचा हा दमदार निकाल मनाला आनंद देणारा आहे.

  • कैलासराव विठ्ठलराव पोले
    गाव.सुरेगाव ता.औंढा(ना) जि.हिंगोली

शिल्ड लाईफसायन्सेसचे गुणवत्तापूर्ण उत्पादने आहेत.ग्राहकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करुन तत्पर सेवा देणं ही त्यांची वेगळी खासियत आहे.

  • किसन बबन मस्तुद
    गाव -हनुमंत पिंपरी ता.केज जि.बीड

उत्पादनात गुणवत्तापूर्ण भरघोस वाढ होण्याची हमी हवी असेल तर अ‍ॅग्रीशिल्ड ब्रँडचे प्रॉडक्ट्स हेच पर्याय आहे.कमी किमतीत दर्जेदार सेवा यामुळे माझ्या सारख्या अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

  • सुधीर दिगंबर काशीद
    पिंपरी (पान) ता.बार्शी जि.सोलापुर

शब्दांकन
लक्ष्मण जाधव

Leave A Reply

Translate »