दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारणार – चंद्रकांत पाटील

अरहम फाउंडेशनतर्फे दिव्यांग राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान

पुणे -दिव्यांगांच्या स्वतंत्र मंत्रालयाप्रमाणेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारणार आहे. विधानसभेत त्यासाठी विधेयक आणणार आहे असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अरहम फाउंडेशनतर्फे आयोजित दिव्यांग राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमात सांगितले. अरहम फाउंडेशनच्या तर्फे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराचे आयोजन नुकतेच पुण्यातील सॅलिसबारी पार्क येथील महावीर प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट चे आमदार सुनील कांबळे, दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे, दैनिक लोकमतचे जनरल मॅनेजर मिलन दर्डा, पुण्याच्या भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे, कौशल्य विकास विभागाचे ओएसडी श्रीपाद ढेकणे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार,अरहम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया, अरहम फाऊंडेशनचे सचिव डॉ.आतिश चोरडिया,अरहम फाऊंडेशनचे खजिनदार श्रीकांत पगरिया, अरहम फाऊंडेशनचे स्वराज पगारीया,विजयकांत कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चिराग सावंत, श्रेया गाढवे, देवेंद्र डेंगळे, सुमय्या पटेल, सागर कटाळे,चिमत अंगमो यांना अरहम फाउंडेशन तर्फे दिव्यांग राष्ट्रीय पुरस्काराने पुरस्काराने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी- पुणे, हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपड – कोल्हापूर, स्नेहालय अहमदनगर पुरस्काराने या संस्थांना दिव्यांग राष्ट्रीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Translate »