ए.एस.जी नेत्र रुग्णालय राबविणार स्वच्छता अभियान

0

पुणे – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ए.एस.जी नेत्र रुग्णालय स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकाच वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गुरुवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी ज्ञानेश्वर पादुका चौकातून हे अभियान सुरु होणार असून पुढे मॉडर्न कॉलेज, जंगली महाराज रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रस्ता असा स्वच्छता अभियानाचा मार्ग असणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकापासून सुरुवात होऊन कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड, शिवार गार्डन ते पुन्हा कोकणे चौक असा मार्ग असणार आहे.  स्वच्छतेबाबतची जाणीव करण्याबरोबरच व कच-याचे वर्गीकरण याबद्दल या अभियानाद्वारे माहिती देण्यात येणार आहे. या अभियानात शालेय विद्यार्थी, युवावर्गासह पुणेकर नागरिक मोठ्याप्रमाणात सहभाग घेणार आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना या अभिनात सहभागी होण्याचे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »