21st PIFF starts accepting entries for Marathi Film competition section

Pune (Voice News Servie): The 21st Pune International Film Festival (PIFF) organized by the Pune Film Foundation in association with Government of Maharashtra has started accepting entries for its Marathi Films competition section. Both censored and uncensored Marathi films of 2022 can apply for the competition. The 21st PIFF will be held in Pune from January 12-19, 2023. The film producers will have to submit 2 DVDs or Vimeo link password while applying for the competition, the deadline for which is 30 November, 2022 before 6 PM.

Film producers will have to comply with rules like the film’s title and banner of the film should be registered with Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal, the film must have been completed between January 1 and December, 31, 2022 and no post-production work should be left, furnish lab or studio certificate confirming that the film is made in 2022 and its DCP is ready. This certificate will be considered only for the 21st Pune International Film Festival. The rules laid down by the PIFF and the Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal will be applicable on all entries.

२१ व्या पिफसाठी मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात

पुणे, दिनांक २२ सप्टेंबर : पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ २०२३’ साठी मराठी चित्रपट स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. सन २०२२ मध्ये सेन्सॉर मिळालेल्या आणि सेन्सॉर न मिळालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना  प्रवेश अर्ज करता येईल. पिफ २०२३ दिनांक १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी प्रवेश अर्ज करताना २ डीव्हीडी किंवा व्हिडीओ लिंक आणि पासवर्ड पाठवणे आवश्यक असून प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६ पर्यंत अशी आहे.

चित्रपटाचे शिर्षक आणि बॅनर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नोंदणीकृत असावे,  १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतच सिनेमा पूर्ण केला गेलेला असावा त्याचे व कोणतेही पोस्ट-प्रोडक्शन संबंधी काम बाकी नसावे, संबंधित चित्रपटाची निर्मिती ही सन २०२२ मध्येच झाली आहे यासाठी लॅब  अथवा स्टुडीओ चे पूर्ततापत्र सादर करून व त्याची डीसीपी प्रिंट दाखवण्यास तयार आहे हे प्रमाणित करून द्यावे आदी बाबींची पूर्तता पिफ २०२३ साठी अर्ज करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी करावयाची आहे.  सदर प्रमाणपत्र फक्त २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा करिता ग्राह्य धरण्यात येईल याची निर्मात्यांनी कृपया नोंद घ्यावी. पिफ आणि चित्रपट महामंडळ यांनी घालून दिलेले सर्व नियम व अटी सर्व प्रवेशिकांवर लागू असतील.

Leave A Reply

Translate »