पुणे लघुपट महोत्सव गालिब्स बुक शॉप ह्याला सर्वोत्कृष्ट लघुपट
पुणे : नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पंधराव्या पुणे लघुपट महोत्सवात गालिब्स बुक शॉप हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला तर द स्टोरी ऑफ युवराज अँड शहाजहान या लघुपटासाठी संतोष राम यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले.
मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय पुणे लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक पत्रकार श्रीकांत कुलकर्णी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन लचके यांच्या हस्ते पार पडले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर आणि पद्माकर नष्टे यावेळी उपस्थित होते. विविध विभागांमध्ये या महोत्सवात 30 पेक्षा अधिक पारितोषिक देण्यात आले.
सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार गुलाम या लघुपटासाठी सौरभ कोळेकर यांना मिळाला तर सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पारितोषिक कुल्फी या लघुपटाने पटकावले तर सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शकाचे पारितोषिक पैज या लघुपाठासाठी वैजनाथ चौगुले यांना मिळाले. सर्वोत्कृष्ट भारतीय पटकथा लेखनासाठी ब्रीद या लघुपटासाठी ओम चाफेकर यांची निवड करण्यात आली अभिनय विभागामध्ये सुरज कांबळे यांना फेरा या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सुजाता देशपांडे यांना निरोप या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि पैज साठी प्रणव सपकाळ यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचे पारितोषिक देण्यात आले. मराठी विभागामध्ये निरोप हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर फिरायला पोटासाठी प्रसाद भुजबळ यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. रायन भोसले यांना निवड या लघुपाठासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून पारितोषिक देण्यात आले