‘महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान पुणे’, आयोजित “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२२” आणि  “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती २०२२” प्रदान सोहळा.

 पुणे: दि. ०१ ऑगस्ट २०२२ रोजी अर्थात पद्मविभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्यात पहिल्यांदाच “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२२” डॉ. गो. बं. देगलूरकर यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आदरणीय बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावे “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती २०२२” अभ्यासक श्री. संदीप तिखे यांना मा. आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. 

             हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सुश्री उषाताई मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी महापौर श्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी ५:३० वाजता होणार आहे. 

            या वेळी पुरस्कार वितरण आणि आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महानाट्य “जाणता राजा” संक्षिप्त स्वरूपात सादर होणार आहे. हा कार्यक्रम अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन सह भारतभर प्रतिष्ठान च्या फेसबुक पेज वर लाइव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. कार्यक्रम विशेष निमंत्रितांसाठी असणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या काही मर्यादित प्रवेशिका दि. १ ऑगस्ट ला बालगंधर्व रंगमंदिर येथे विनाशुल्क उपलब्ध असणार आहेत. 

(प्रतिष्ठानने या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही निमंत्रित केलेले आहे. तरी मा. देवेद्रंजीही या कार्यक्रमास उपस्थित असतील अशी दाट शक्यता आहे)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्काराचे स्वरूप – रु १ लाखाचा धनादेश, मानचिन्ह, मानपत्र.

श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्तीचे स्वरूप – रु ५०,००० चा धनादेश, मानचिन्ह.

कार्यक्रमाचे स्थळ – बालगंधर्व रंगमंदिर, पुणे. दि. ०१ ऑगस्ट २०२२ वेळ – संध्या ०५:३० वा.

Leave A Reply

Translate »