इंप्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमीतर्फे सिडेस्को परीक्षेचा पदवीदान समारंभ व विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पुणे -इंप्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमीतर्फे सिडेस्को परीक्षेचा पदवीदान समारंभ व विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा पी. वाय. सी. डेक्कन जिमखाना येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी मीडिया मेकअप या अभ्यासक्रमाबद्दल मान्यवरांच्या हस्ते अकरा विद्यार्थिनींना इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या संचालिका कल्याणी उमराणी यांच्या आई पुष्प भगत व वडील सुहास भगत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षातून एक वेळा संस्थेचा स्नेह मेळावा घेतला जातो परंतु गेल्या दोन वर्षापासून हा मेळावा घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा स्वित्झर्लंड सह 65 देशात संलग्न आहे. सिडेस्को परीक्षेसाठी प्रचंड तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. या अभ्यासक्रमासाठी पात्रता दहावी पास असून कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती हा कोर्स करू शकतात. महिलांसाठी या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध असून बऱ्याचशा महिलांचा कल हा आता मेकअप क्षेत्राकडे वळला आहे. कल्याणी उमराणी या ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिलच्या बोर्ड मेंबर आहेत. त्यामुळे इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमीचे एक वेगळे महत्त्व असून सिडेस्को परीक्षेसाठी संलग्न पुण्यातील ही संस्था आहे. या अकॅडमीतील विद्यार्थ्यांना पुढे ओटीटी प्लॅटफॉर्म, फॅशन शो ,ब्युटी कॉन्टेस्ट, लग्नाचे मेकअप ,पार्टी ,इव्हेंट व टीव्ही सिरीयल मध्ये रोजगाराच्या संधी आहेत.या अकॅडमी त रेगुलर ब्युटीशियन कोर्सेस , ब्युटी पार्लर काढण्यासाठी सलून मॅनेजमेंट कोर्सेस व संपूर्ण कन्सल्टन्सी येथे दिली जाते.या पदवीदान समारंभात इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली. तसेच या अकॅडमी मधून उत्तीर्ण झालेल्या व सध्या ब्युटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केली.या अकॅडमीमध्ये विद्यार्थिनींना भरपूर प्रॅक्टिस व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पुढेही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इम्प्रेशन इंटरनॅशनल ॲकॅडमी तर्फे मार्गदर्शन केले जाते. यावेळी या माजी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याणी उमराणी म्हणाल्या की आमच्या या इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण मेकअप संदर्भात जागतिक दर्जाचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते.तसेच त्यांना या क्षेत्रात चांगले मार्गदर्शन केले जाते.त्यासाठी अनुभवी शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत असतात. तसेच हा अभ्यासक्रम छंद म्हणून नसून या अभ्यासक्रमात व्यवसायाच्या संधी मिळण्या चे परिपूर्ण प्रशिक्षण येथे दिले जाते. या अकॅडमीमध्ये डिप्लोमा इन प्रोफेशनल ब्युटी थेरपी ,डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजी डिप्लोमा इन सलून मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.त्यामुळे या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थिनी त्यांच्या इतर अभ्यासक्रमाबरोबर व नोकरी सांभाळूनसुद्धा ब्युटी क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय आत्मविश्वासाने सुरू करू शकतात. या कार्यक्रम प्रसंगी मिताली मोरे, फॅशन मॉडेल श्रुती पाटोळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन लाईफ कोच व फॅशन मॉडेल डॉ. प्रचिती पुंडे यांनी केले.

Leave A Reply

Translate »