निर्माते संतोष चव्हाण यांचा बालगंधर्व पुरस्काराने सन्मान 

चित्रपटसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बालगंधर्व परिवार संस्थेच्या वतीने गौरव 

पुणे :  बालगंधर्व रंगमंदिरांच्या 54 व्या वर्धापन दिना निमित्त उद्योजक आणि चित्रपट निर्माते संतोष चव्हाण यांना कला क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल बालगंधर्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बालगंधर्व परिवार संस्थेच्या वतीने आयोजित बालगंधर्व महोत्सवात हा पुरस्कार दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे ,अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते संतोष चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

संतोष चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत मागील 20 वर्षाहून अधिक काल सक्रिय आहेत. निर्माते, उद्योजक असलेले चव्हाण आपल्या व्यस्त वेळेतून कोणत्याही संकटात कलाकार, तंत्रज्ञ यांच्या मदतीला धावतात.  कला क्षेत्रात कार्यरत राहताना त्यांनी स्वतः चे असे एक व्यावसायिक विश्व निर्माण केले आहे.  सन 1998 पासून मराठी – हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये कार्यरत आहेत , या कारकिर्दीत त्यानी अनेक चित्रपट, मालिका, वेबसिरीज,  नाटक यासाठी निर्मिते, सहनिर्माते म्हणून काम केले आहे, तसेच अभिनया बरोबरच  संहिता लेखन आणि  काही नाटकांसाठी दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली आहे .

आजमितीला संतोष चव्हाण यांच्या 14 कंपन्याची यशस्वी घोडदौड चालू असून 20 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. व्यवसायाचा हा डोलारा सांभाळताना संतोष चव्हाण या वल्लीने समाजकार्याची कास कधीच सोडली नाही. आज आपल्या trading कंपनी च्या माध्यमातून संतोष चव्हाण यांनी  27 हजाराहून अधिक लोकांना ट्रेडिंग चे मोफत प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले आहे

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कलाकार तंत्रज्ञ मंडळी साठी मोफत रुग्णवाहिका लवकरच सुरू करणार आहे.
तसेच आपल्या को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या माध्यमातून कलाकार व तंत्रज्ञ मंडळीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या खिलाडूवृत्ती साठी प्रसिद्ध असणाऱ्या संतोष चव्हाण यांची क्रीडा क्षेत्रात ही उल्लेखनीय यश मिळवले आहे, क्रिकेट मध्ये रणजी पर्यंत मजल मारताना, फूल मॅरेथॉन प्रकारा मध्ये 30 पारितोषिके पटकवली आहेत.

Leave A Reply

Translate »