लेक्सीकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे फिटनेस फ्रायडे ची सुरुवात
पुणे:कोरोनच्या महामारीने फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीचे महत्व स्पष्ट केले आहे. आपल्या जीवनात वर्कआउट रूटीन किंवा व्यायामाची दिनचर्या समाविष्ट करणे ही केवळ एक आवड नसून अलीकडच्या काळात गरज बनली आहे. हीच गरज लक्षात घेता लेक्सिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट ने आपल्या सर्व संस्थांमध्ये प्रत्येक शुक्रवार हा फिटनेस फ्रायडे म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. सर्व संस्थांमधील फिटनेस फ्रायडेजमध्ये एरोबिक्स, झुंबा, योग, सएन्ड्युरन्स, कार्यात्मक प्रशिक्षण, क्रिकेट यांसारख्या एक तासाच्या मजेदार निरोगी क्रियाकलापांचा समावेश असतो.
“लेक्सिकॉनमध्ये, आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की प्रत्येक व्यक्ती-विद्यार्थी, कर्मचारी आणि भागधारकांना थोडा वेळ काढण्याची आणि काही मजेदार फिटनेस क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल.आपल्या आधुनिक काळातील व्यस्त वेळापत्रकांमुळे आपल्यापैकी बरेच जण अजूनही वर्कआउट रूटीन तयार करण्यात संघर्ष करतात आणि जर हे छोटे पाऊल लोकांना निरोगी जीवनशैली सुरू करण्यास प्रोत्साहित करत असेल तर ते आणखी चांगले आहे. आम्ही या वर्षी ‘आरोग्य, फिटनेस आणि आनंद’ ही आमची थीम ठेवली आहे आणि संस्थेतील प्रत्येकजण फिटनेस फ्रायडेसचा एक भाग होता हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे,” असे प्रतिपादन सुश्री शगुफ्ता अशरफ खत्री, प्रमुख – ब्रँडिंग आणि मार्केटिंग, द लेक्सिकॉन ग्रुप आणि मल्टीफिट यांनी केले.
लेक्सिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सुरुवातीपासूनच आपल्या सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या विकासाला महत्त्व दिले आहे. संस्थेतील प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विकासाह सर्वांगीण वाढीस प्रोत्साहन देणे आणि त्यांचे समर्थन करणे हा लेक्सिकॉनच्या संस्कृतीचा एक भाग आहे. फिटनेस फ्रायडे सारख्या उपक्रमाद्वारे लेक्सिकॉन ग्रुप आपल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये फिटनेसची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याद्वारे एक निरोगी व मानसिकरित्या संपन्न समाज निर्मण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकणे हा उद्देश आहे.