रसवंती करंडक’ ला उत्साहात सुरुवात

पुणे : अ‍ॅड योगेश दिलीप राव नाईक प्रस्तुत आणि न्यू नटराज थिएटर्स पुणे आयोजित  ‘रसवंती करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सोमवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागातील महाविद्यालयांचा समावेश आहे.प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

‘रसवंती करंडक’ स्पर्धेविषयी माहिती देताना ,अ‍ॅड योगेश दिलीप राव नाईक म्हणाले की, माझे वडील दिलीप मोहनराव नाईक यांनी 24 वर्षांपूर्वी या स्पर्धेची सुरुवात केली.

स्पर्धेत पहिल्या दिवशी मराठवाडा मित्र मंडळ,  मॉडर्न कॉलेज, उमंग थिएटर,  क्राउड फिल्म्स नाट्यसंस्था, प्राण मुंबई, ओव्हीयान थिएटर, के इ एस श्रॉफ कॉलेज, कलरफुल मॉक, अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, यांच्या एकांकिका सादर झाल्या, तर स्पर्धेत उद्या स्वामी नाट्यांगण,डोंबिवली. दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी, नाट्यागंधर्व डोंबिवली, रंगयात्रा इचलकरंजी या संधाचे सादरीकरण होणार आहे. तर उद्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निर्माते किरण कुमावत,दिग्दर्शक चेतन चावडा आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे अ‍ॅड योगेश दिलीपाराव नाईक यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »