‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या द्वितीय श्रेणी गटात रिअल पुणे युनायटडे संघ अव्वल !

0

 पुणे : पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या द्वितीय आणि तृतीय श्रेणी गटाच्या सामन्यांमध्ये रिअल पुणे युनायटेड संघाने अव्वल स्थान मिळवत या गटाचे विजेतेपद मिळवले.

एसएसपीएमएस महाविद्यायल फुटबॉल मैदान, संगमपुल येथे पीडीएफए २०१९ लीग स्पर्धेचे उर्वरित व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटाचे सामने झाले होते. यामध्ये रिअल पुणे युनायटेड, सिग्मय एफसी, रेेंजहिल्स् यंग बॉईज, ब्ल्यु स्टॅग एफसी, एफसी बॅकडिनो, खडकी ब्ल्युज्, चेतक एफसी आणि न्यु इंडिया क्लब या संघांमध्ये सामने खेळविण्यात आले होते.

रिअल पुणे युनायटेड संघाने ५ विजय, १ पराभव आणि १ बरोबरी अशी कामगिरी करत १६ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. सिग्मय फुटबॉल क्लब संघानेही ५ विजय, १ पराभव आणि १ बरोबरी अशी कामगिरी केली. पण साखळी सामन्यांमध्ये रिअल पुणे युनायटेड संघाने सिग्मय फुटबॉल क्लबला २-० असे पराभूत केले होते. त्यामुळे रिअल पुणे युनायटेड संघाला अव्वल स्थान मिळाले. रिअल पुणे युनायटेडकडून स्वप्निल पवार आणि मयांक चर्तुवेदी यांनी सर्वाधिक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय कर्णधार आणि मध्यरक्षक अभिजीत वाघमारे याने संघाचा समतोल राखत हे यश मिळवून दिले.

रिअल पुणे युनायटेड, सिग्मय एफसी, रेेंजहिल्स् यंग बॉईज, ब्ल्यु स्टॅग एफसी या व्दितीय श्रेणी गटाच्या अव्वल चार संघांना आता प्रथम श्रेणी गटामध्ये बढती मिळली असून यापुढील स्पर्धेत त्यांना अव्वल श्रेणी गटात खेळायचा मान मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »