Hunderman village in Kargil on the Indo-Pak border to have ‘Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Library’

The library will be set up jointly by Akhil Sadashiv-Shaniwar-Narayan Peth Ambedkar Jayanti Festival Committee, Vande Mataram Sanghatana, Sarhad

Pune: Akhil Sadashiv-Shaniwar-Narayan Peth Ambedkar Jayanti Mahotsav Samiti has been celebrating the birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar for years. This year following the National Unity slogan a library will be set up at Hunderman village in kargil on the Indo-Pak border with contribution of Vande Mataram Sanghatana and Sarhad.

“Every citizen of the country came to know Kargil due to the Kargil War; however, The majority of citizens are not aware that Kargil is basically a Buddhist land with a message of peace. Due to the extremely remote geographical location and political apathy, this land of patriotic and peace-loving citizens has been deprived of development. That is why on behalf of ‘Sarhad’ we have decided to develop Hunderman village in Kargil as ‘Village of National Integration’. To begin with ‘Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Library is being set up,” informed Vaibhav Wagh, State President of Vande Mataram Association, Sachin Jamge, State Working President, Advocate Anish Padekar, Anagha Phatak Joshi, Mahesh Batle, Ganesh Deshpande.

It is requested of all citizens and organizers of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti events to donate only English language books for this library.

Those who want to donate books for the Bharatratna Babasaheb Ambedkar Library (kargil) should contact 9766781659.

भारत-पाक सीमेवरील कारगिलच्या हुंदरमन गावातसाकारतेय ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय’

अखिल सदाशिव-शनिवार-नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समिती,वंदेमातरम् संघटना, सरहद यांचा संयुक्त उपक्रम
पुणे : ‘राष्ट्रपुरुष आपल्या हक्काचे, नाही कोणत्या जातीचे’ हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीरुपी अभिवादन करण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून अखिल सदाशिव-शनिवार-नारायण पेठ आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. या वर्षी राष्ट्रीय एकात्मतेचा नारा अधिक बुलंद करत थेट कारगिलमधील हुंदरमन या भारत-पाक सीमेवरील गावात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय’ साकारण्याचा संकल्प केला आहे. वंदेमातरम् संघटना, सरहद संस्था यांचे या उपक्रमाला उत्स्फूर्त योगदान लाभले आहे.

कारगिल युद्धामुळे कारगिल हे नाव देशातल्या प्रत्येक नागरिकाला माहित झाले असले, तरी मुळात कारगिल शांततेचा संदेश देणारी बुद्धभूमी आहे. ही बाब बहुसंख्य नागरिकांना माहित नाही. अत्यंत दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि राजकीय अनास्था यामुळे देशाभिमानी आणि शांतताप्रिय नागरिकांची ही बुद्धभूमी विकासापासून वंचित राहिली आहे. म्हणूनच ‘सरहद’च्या वतीने आपण कारगिलमधील हुंदरमन हे गाव ‘राष्ट्रीय एकात्मतेचे गाव’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प केला आहे. हुंदरमनमधील कामाची सुरुवात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय’ उभारून होत आहे, अशी माहिती वंदेमातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, ॲडव्होकेट अनिश पाडेकर, अनघा फाटक जोशी, महेश बाटले, गणेश देशपांडे यांनी दिली.

सर्व नागरिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजक मंडळ यांना आवाहन करण्यात येते की, या ग्रंथालयासाठी फक्त इंग्रजी भाषेतील पुस्तके दान करुन आपण भारतरत्नास अभिवादन करावे. ‘ही व्यक्ती, हा विचार नाही फक्त एका निळ्या रंगाचा, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अभिमान तिरंग्याचा…’ हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या ग्रंथालयाच्या उभारणीत योगदान द्यावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय (कारगिल) या ग्रंथालयासाठी इंग्रजी पुस्तके दान करण्यासाठी ९७६६७८१६५९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे, तसेच या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी वैभव वाघ : ९८९०७९८९०३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Translate »