महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (MASMA) च्या वतीने “सोलर एक्स्पो”चे आयोजन

सौर उर्जा उपकरणांचे प्रदर्शन…

पुणे: सध्याच्या कोळसा टंचाईमध्ये आणि वाढत्या प्रदुषणाला सौर उर्जा उपकरणे वापरणे हा एकच उपाय आहे. वर्षातील ३२० दिवस आपल्याकडे मुबलक सुर्यप्रकाश आहे आपल्या देशाला नैसर्गिक देणगी मिळालेली आहे. याच सुर्यप्रकाशाचा वापर करुन विविध क्षेत्रासाठी लागणार्‍या विज निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी विविध उपकरणे वापरली जातात या सौर उपकरणांचे प्रदर्शन पुण्यात येत्या शनिवार आणि रविवारी १६ आणि १७ एप्रिल २०२२ रोजी डिपी रोडवरील सिद्धी बॉन्टेक्यू येथे आयोजित करण्यात आले आहे. सौर उर्जा क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान तसेच सबसिडीविषयी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्र देखील रविवारी दुपारी २:०० वा. यावेळी होणार आहे.

सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पाहण्यासाठी पुणेकरांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) च्या वतीने “सोलर एक्स्पो २०२२”चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय प्रदर्शन हे शनिवार आणि रविवार सकाळी १० ते ६ यावेळेत असणार आहे. तब्बल ४० हून अधिक सौर उर्जा उपकरण उत्पादकांची उत्पादने याठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. यामध्ये छोट्यात छोट्या वस्तू पासून ते मोठ्या उद्योजकांना लागणारी उपकरणे आहेत. सर्वसामान्य ग्राहक ते लघु मध्यम उद्योजक यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार असल्याची माहिती माहिती महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (MASMA)चे अध्यक्ष राजेश मुथा यांनी दिली.

यावेळी मास्माचे संचालक समिर गांधी, सचिव जयेश अकोले, शशीकांत वाकडे, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, नरेंद्र पवार, रोहन उपासनी उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »