बोस्‍टन सायण्टिफिकने दुस-या आरएंडडी सेंटरसह भारतातील आपल्‍या उपस्थितीमध्‍ये केली वाढ

अमेरिकेनंतर आता भारत कंपनीचे सर्वात मोठे आरएंडडी हब

पुणे: बोस्‍टन सायण्टिफिक कॉर्पोरेशन (NYSE: BSX) ने आज देशाच्‍या आरएंडडी कौशल्‍यामध्‍ये अधिक गुंतवणूक करत देशातील अभियंते व नवप्रवर्तकांना वैविध्‍यपूर्ण संधी देण्‍याच्‍या मनसुब्‍यासह पुणे येथे अत्‍याधुनिक आरएंडडी सेंटर लाँच केले. भारतातील हे त्‍यांचे दुसरे सेंटर आहे.

फिजिशियन वैज्ञानिक आणि नीति आयोगचे सेवारत सदस्‍य डॉ. विनोद के. पॉल, तसेच बोस्‍टन सायण्टिफिक एपीएसीचे कार्यकारी उपाध्‍यक्ष व अध्‍यक्ष आर्ट बुचर, बोस्‍टन सायण्टिफिक एपीएसीच्‍या आरएंडडी उपाध्‍यक्ष राल्‍फ कार्डिनल, बोस्‍टन सायण्टिफिक इंडियाच्‍या आरएनडीचे संचालक संजीव पांड्या आणि बोस्‍टन सायण्टिफिक इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मनोज माधवन यांच्‍या हस्‍ते या नवीन केंद्राचे उद्घाटन करण्‍यात आले.

बोस्‍टन सायण्टिफिक या यूएस-स्थित मेडिकल डिवाईस कंपनी आणि मेडिकल सोल्‍यूशन्‍सच्‍या आघाडीच्‍या नवप्रवर्तक कंपनीने २०१४ मध्‍ये गुरगाव येथे त्‍यांचे पहिले आरएंडडी सेंटर स्‍थापित केले. तेव्‍हापासून सेंटरने १०० हून अधिक पेटेण्‍ट फिलिंग्‍स आणि नवोन्‍मेष्‍कारी संकल्‍पनांचे योगदान दिले आहे. पुण्‍यातील दुसरे आरएनडी सेंटर सुरूवातीला १७० अभियंत्यांना रोजगार देईल, ज्‍यामुळे बोस्‍टन सायण्टिफिकच्‍या आरएंडडी कर्मचा-यांची एकूण संख्‍या ३०० हून अधिक पर्यंत पोहोचेल. सेंटर ७०,००० चौरस फूट जागेवर पसरलेले आहे आणि आरएंडडी प्रक्रियेची सुविधा देण्‍यासाठी व अधिक आरएंडडी क्षमता निर्माण करण्‍यासाठी अत्‍याधुनिक वैद्यकीय उपकरण व सिम्‍युलेटर्ससह सुसज्‍ज आहे.

उद्घाटनाप्रसंगी बोलताना बोस्‍टन सायण्टिफिक एपीएसीच्‍या आरएनडीचे उपाध्‍यक्ष राल्‍फ कार्डिनल म्‍हणाले, ”आरएंडडी व वैद्यकीय विज्ञानामध्‍ये गुंतवणूक करणे जगभरातील रूग्‍णांना साह्य करणारे वैद्यकीय तंत्रज्ञान व उपाययोजना विकसित करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. जागतिक स्‍तरावर बोस्‍टन सायण्टिफिक दरवर्षाला आरएंडडी मध्‍ये १ बिलियन यूएस डॉलर्सची गुंतवणूक करते आणि आम्‍हाला पुण्‍यातील या दुस-या आरएंडडी सेंटरच्‍या उद्घाटनासह भारतामध्‍ये उपस्थिती निर्माण करण्‍याचा आनंद होत आहे.”

नवीन आरएंडडी सेंटर कंपनीच्‍या सर्व वैवि‍ध्‍यपूर्ण थेरपी क्षेत्रांना कौशल्‍य प्रदान करेल, जसे इंटरवेन्‍शनल कार्डियोलॉजी, पेरिफेरल इंटरवेन्‍शन्‍स, कार्डियक रिदम मॅनेजमेंट, एण्‍डोस्‍कोपी, न्‍यूरोमॉड्युलेशन आणि युरोलॉजी व पेल्विक हेल्‍थ. पुण्‍यातील आरएंडडी टीम मेकॅनिकल डिझाइन व विश्‍लेषण, सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग, स्थिर इंजीनिअरिंग, दर्जा व अनुपालन या क्षेत्रांमध्‍ये परिपूर्ण सर्वांगीण पाठिंबा देईल.

”हे दुसरे आरएनडी सेंटर बोस्‍टन सायण्टिफिकचा भारतातील आरएन डी कौशल्‍यावरील विश्‍वासाला दाखवते आणि देशातील अभियंते व नवप्रवर्तकांना वैवि‍ध्‍यपूर्ण संधी देते. आमच्‍या प्रवासामधील हे प्रमुख पाऊल आहे, जेथे आम्‍ही भारतातील नवोन्‍मेष्‍काराच्‍या माध्‍यमातून भारत, विस्‍तृत एपीएसी प्रदेश आणि जगभरातील रूग्‍णांच्‍या गरजांची पूर्तता करतो,” असे बोस्‍टन सायण्टिफिक इंडियाच्‍या आरएंडडीचे संचालक संजीव पांड्या म्‍हणाले.

उद्घाटनादरम्‍यान बोस्‍टन सायण्टिफिक इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मनोज माधवन म्‍हणाले, ”बोस्‍टन सायण्टिफिकमध्‍ये आम्‍ही नवोन्‍मेष्‍काराला अधिक प्राधान्‍य देतो आणि आम्‍हाला भारतातील आरएंडडी टॅलेण्‍टबाबत आत्‍मविश्‍वास आहे. हे दुसरे आरएंडडी सेंटर भारतातील वैद्यकीय डिवाईसेससाठी नवोन्‍मेष्‍कारी क्षेत्राप्रती अर्थपूर्ण योगदान देण्‍याच्‍या आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.” 

Leave A Reply

Translate »