दलित पँथरचे नवनियुक्त केंद्रीय अध्यक्ष तायडे यांना महाराष्ट्रातील पँथर्सचा निषेध

यशवंतभाऊ नडगम यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर कामगार संघटनेची स्थापना

पुणे: पद्मश्री नामदेवदादा ढसाळ यांच्या वतीने स्थापन केलेली दलित पँथर ही एक अंबेडकरी संघटना आहे. या संघटनेच्या शाखा आज संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी पहायला मिळतात. १९७२ पासून ते आजतागायत नामदेव ढसाळ यांच्या विचारांचा प्रभाव असंख्य समाज बांधवांवर झाला. काही काळापासून मल्लिकाताई ढसाळ याच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या या संघटनेत काही दिवसांपूर्वी रामभाऊ तायडे यांना केंद्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले असता त्यांचा निषेध राज्यभरातील पँथर्सच्या वतीने होतांना पहायला मिळतो. 


नामदेवदादा ढसाळ यांच्या सोबत लगभग २२ वर्षे समाजातील विविध घटकात काम केलेले यशवंत नडगम यांनी महाराष्ट्र संघटनेची बांधणी मोठ्या प्रमाणात केली. व लखो समाज बंधू भगिनींना आधर देण्यासाठी प्रयत्न केले. अनेक निवडणूकीत मोठ्या पाठबळावर विजय पताका संघटनेमुळे फडकल्या. यासाठी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील अनेक पँथर्सच्या वतीने यशवंत भाऊ नडगम यांना केंद्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले व शुभेच्छा दिल्या. तसेच दलित पँथर कामगार संघटनेची घोषणा देखील त्यांच्या वतीने या वेळी करण्यात आली.

Leave A Reply

Translate »