First Time in Pune Free Matrimonial Service for above 50 +years single (Jeevan Saathi Sammelan)

Organized by Sindhu Seva Dal, Pune for all caste and Religion on 30/1/2022 at Alpa Bachat Bhavan, Pune 411001

In Pune, a unique matchmaking event is being organized for Single Men & Women aged 50 + (Unmarried, divorced & widowed) from 9.30 a.m to 4.00 p.m on 30th January 2022 (Sunday) at Alpa Bachat Bhavan, Pune, 411001. This event will be free of cost for candidates irrespective of Caste, Religion & State by Sindhu Seva Dal Pune, a renowned social organization working for Social and Cultural Development from the last 33 years.

This information was given to the press by Peter Dalwani (President) & Manohar Pherwani (Program Coordinator & past president) of Sindhu Seva Dal.  Sachin Talreja, Nilesh Pherwani (Secretary) & Suresh Jethwani (Past President & Spokesperson) & Kiran Pherwani (Past President) of Sindhu Seva Dal were also present during the Press Meet.

This event is the first ever event in the history of Pune for 50 years of single people who are interested in marriage. Every participant in this event can choose their life partners irrespective of their caste, religion, Language and Statehood for free of cost. There are many people in our society who live alone who need a life partner. Understanding this necessity, Sindhu Seva Dal, is organizing this event.

Having inspired from the initiative of ‘Anubandh Foundation ‘this program is organized for the betterment of single citizens who are highly disregarded by their dependents and life for want of somebody’ care and attendance become miserable and to help them to find a suitable life partner to pass the rest of life in peace and happiness, said Manohar Pherwani.

Those who are interested in this event should submit their application before 31st December 2021. Only those who have registered will be eligible to participate in this event. For more information, please contact to Varsha Mohnani (9049464151) / Divya Mohanani (8999719024), added by Manohar Pherwani (9850690246) Email: eventsindhusevadal@gmail.com).

ज्येष्ठांसाठी पुण्यात प्रथमच वधू-वर मेळावा
-५० वर्षांवरील एकल विवाहेच्छूकांसाठीपहिल्यांदाच मोफत जीवनसाथी संमेलन
सिंधू सेवा दलातर्फे सर्व जाती-धर्मांसाठी ३० जानेवारी २०२२ रोजी आयोजन

पुणे : गेल्या ३३ वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सिंधू सेवा दल या नामवंत सामाजिक संस्थेतर्फे ५० वर्षांवरील सर्व जाती-धर्मातील एकल महिला व पुरुषांसाठी मोफत जीवनसाथी संमेलन आयोजिले आहे. येत्या ३० जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील अल्पबचत भवन येथे ज्येष्ठांसाठी पहिल्यांदाच असा अनोखा विवाह मेळावा होत आहे, अशी माहिती देण्यासाठी सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष पीटर दलवानी व कार्यक्रमाचे संयोजक मनोहर फेरवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिंधू सेवा दलाचे सचिव सचिन तलरेजा, निलेश फेरवानी, पीआरओ किरण फेरवानी, माजी अध्यक्ष व प्रवक्ता सुरेश जेठवानी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा ५० वर्षांवरील विवाहेच्छूकांचा मेळावा होत आहे. सर्व जाती-धर्मांतील एकल महिला व पुरुषांना या मेळाव्यात सहभागी होऊन आपला जीवनसाथी निवडता येणार आहे. कोणत्याही जातीतील, धर्मातील किंवा राज्यातील अविवाहित, घटस्फोटित, विधवा, विधुर लोकांना हा मेळावा खुला आहे. हा मेळावा पूर्णतः मोफत असणार आहे. आज समाजात एकट्या राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आज त्यांना जीवन व्यतीत करण्यासाठी एकमेकांची काळजी घेणाऱ्या जोडीदाराची गरज आहे. हीच गरज ओळखून संस्थेने हा ऐतिहासिक मेळावा भरवला आहे.
मनोहर फेरवानी म्हणाले, “अनुबंध फाउंडेशन या संस्थेकडून प्रेरणा घेत एकल ज्येष्ठांसाठी हा मेळावा घेत आहोत. अविवाहित ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या अवलंबितांकडून अत्यंत अवहेलना केली जाते आणि काळजी, प्रेम आणि साहवासाअभावी त्यांचे जीवन दयनीय बनते. यातून बाहेर पडत आनंदी जीवन जगण्यासाठी जोडीदार शोधण्याची संधी त्यांना देण्याचा प्रयत्न आहे.”
इच्छुकांनी संस्थेशी संपर्क करून विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यायचा आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत नाव नोंदवणाऱ्यांना या मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी वर्षा मोहनानी (९०४९४६४१५१), दिव्या मोहनानी (८९९९७१९०२४) यांच्याशी किंवा eventsindhusevadal@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन मनोहर फेरवानी यांनी केले.

Leave A Reply

Translate »