Medium Spicy: Film To Close River To River Florence Indian Film Festival

Pune (P&V news service): After an overwhelming response at the screenings in Norway Bollywood Festival and Dallas / Fort Worth South Asian Film Festival, Marathi film Medium Spicy has been selected as the closing film for the 21st edition of the River To River Florence Indian Film Festival.

The film directed by Mohit Takalkar stars Sai Tamhankar, Lalit Prabhakar and Parna Pethe along with an interesting ensemble featuring Sagar Deshmukh, Neha Joshi, Pushkaraj Chirputkar, Ipshitaa, veteran actors Neena Kulkarni and Ravindra Mankani in important roles. The film shot in Pune and Mumbai, is touted to be a potpourri of relationships, love and marriage in urban lives.
Producer Vidhi Kasliwal of Landmarc Films says, “After finishing the film, as we were gearing up for its release; the pandemic struck the whole world. It has been a challenging time for everyone including the film industry. However, things are looking up now. The response has been striking thus far and it looks like the film was destined to find its first audiences through film festivals across the globe.”

Medium Spicy will be screened live on-ground in Florence, Italy at the iconic La Compagnia cinema on the 8th of December. It would also be available online simultaneously for people attending the film festival virtually all over Italy. Both Kasliwal and Takalkar will be present on-line for a digital meet and greet with the audience on the closing night.

Happy about the film’s screening in Florence, Takalkar says, “As a filmmaker, there is no better feeling than your film being watched and appreciated by people from around the world. I am excited about how it will be to watch the film on a big screen at a beautiful venue in Florence.”
Eminent personalities like Amitabh Bachchan, Anurag Kashyap, Nawazuddin Siddiqui and Taapsee Pannu have attended the earlier editions of River to River Florence Indian Film Festival.

‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मराठमोळ्या ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाने होणार सांगता !

नॉर्वे बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल आणि दलास / फोर्ट वर्थ साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या २१ व्या आवृत्तीसाठी मराठमोळ्या ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाची निवड करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाने या फिल्म फेस्टिव्हलची सांगता होईल.

मोहित टाकळकर दिग्दर्शित, ‘मीडियम स्पाइसी’ हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, तसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणतात, “सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतर, आम्ही सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी करत होतो; त्याच दरम्यान कोरोना महामारीने संपूर्ण जगाला तडाखा दिला. सर्वांसह सिनेसृष्टी साठी सुद्धा हा एक आव्हानात्मक काळ होता. आता हळूहळू सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. तसेच आमच्या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. यावरून असे दिसते की ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा जगभरातील चित्रपट महोत्सवाद्वारे जगातील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचेल.”

‘मीडियम स्पाइसी’ ८ डिसेंबर रोजी इटलीमधील, फ्लॉरेन्स येथील ‘ला कॉंपाग्निया’ या आकर्षक सिनेमागृहात थेट ऑन-ग्राउंड दाखवला जाईल. संपूर्ण इटलीमध्ये चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ते एकाच वेळी ऑन-लाइन सुद्धा उपलब्ध असेल. विधि आणि मोहित हे दोघेही डिजिटल मीटसाठी उपस्थित राहतील आणि चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना वर्चुअल अभिवादन करतील.

फ्लॉरेन्समध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करताना मोहित टाकळकर म्हणतात, “एक दिग्दर्शक म्हणून, देश विदेशातील लोकांनी तुमचा चित्रपट पाहिला आणि त्याचे कौतुक केले यापेक्षा चांगली भावना दुसरी नाही. फ्लॉरेन्समधील एका सुंदर ठिकाणी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे किती प्रेक्षणीय असेल याबद्दल मी उत्सुक आहे.”

अमिताभ बच्चन, अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तापसी पन्नू यासारख्या नामवंत कलाकार ‘रिवर टू रिवर फ्लॉरेन्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल’च्या पूर्वीच्या आवृत्तीत सहभागी झाले होते.

Leave A Reply

Translate »