दुर्गामाता प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामातेच्या मंदिरात भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

आंबेगाव खुर्द, हनुमाननगर (पुणे): दुर्गामाता प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी विजयादशमीच्या निमित्ताने दुर्गामातेच्या मंदिरात भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. देवीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि जयकारांच्या घोषात मोठ्या दिमाखात काढण्यात आली. गावभर नटलेल्या रांगोळ्या, फुलांच्या तोरणांनी सजलेले रस्ते आणि भगव्या पताका या सगळ्यामुळे परिसरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.

दोन तास चाललेल्या गोंधळी वादनाने उपस्थितांची मने जिंकली. कलाकारांच्या दमदार वादनाने वातावरण दुमदुमून गेले व भक्तांनीही या क्षणांचा मनमुराद आनंद घेतला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पारखे यांनी केले. त्यांच्या उत्साहवर्धक नेतृत्वामुळेच कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित नागरिक, मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींनी पारखे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. अखंड हरिनाम संकीर्तन, देवीच्या आरत्या व धार्मिक उपक्रमांनी विजयादशमीचा दिवस संस्मरणीय बनला.

Leave A Reply

Translate »