प्रभाग 9 मध्ये तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सगळ्यांच्या मनात एकच नाव – लहू बालवडकर
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी असून, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर हे प्रभागातील सर्व वयोगटांमध्ये विश्वासाचं नाव ठरताना दिसत आहेत.गावभेट दौरे, पदयात्रा, नागरिकांशी थेट संवाद आणि भेटीगाठी
सध्या महापालिका निवडणुकीसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू असताना लहू बालवडकर हे सातत्याने गावभेट दौरे, पदयात्रा, नागरिकांशी थेट संवाद आणि भेटीगाठी घेत आहेत. मात्र ही सक्रियता निवडणुकीपुरती मर्यादित नसून, गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत मदतीचं कार्य केल्याचं नागरिक आवर्जून सांगतात.
तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास
प्रभाग ९ मध्ये अनेक ठिकाणी निवडणुकीच्या वेळीच दिसणारे चेहरे असताना, लहू बालवडकर हे मात्र कोणतंही पद नसतानाही लोकसेवेचं काम सातत्याने करत आले आहेत. याचाच परिणाम म्हणून आज तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहे.महिला वर्गासाठी महिला मेळावे, महिला सक्षमीकरणासाठी विविध शिबिरे, स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम, तर लहान मुले व तरुणांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक व क्रीडा मंच उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत, बारा मल्हार पादुका एका ठिकाणी आणण्यासारखी ऐतिहासिक आणि श्रद्धेची कामे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.
प्रत्येकाच्या मनातला नगरसेवक
या सर्व कामांमुळे प्रभाग ९ मध्ये लहू बालवडकर यांची ओळख केवळ उमेदवार म्हणून नाही, तर प्रत्येकाच्या मनातला माणूस अशी झाली आहे. विकास, सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळेच प्रभागातील तिन्ही घटकांमध्ये त्यांची लोकप्रियता लक्षणीय वाढताना दिसत आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९ मधील राजकीय समीकरणे लक्षवेधी ठरत असून, लहू गजानन बालवडकर यांना मिळणारा जनसमर्थनाचा वाढता ओघ आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Comments are closed.