पुण्यात बालवडकर कुटुंबीयांकडून भव्य बैलपोळा साजरा
पुणे : परंपरा आणि भक्तीचा संगम घडवत बालवडकर परिवाराकडून यंदाही बैलपोळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष आकर्षण ठरले ते दगडूशेठ गणपती विसर्जन मुरवणूकीचे मानाचे बैल. पारंपरिक वेशभूषेत, चांदीच्या तोड्यांनी सजलेले हे बैल. बैलांची भव्य मिरवणुक काढण्यात आली.
गेल्या ३५ वर्षांपासून बालवडकर कुटुंब बैलपोळ्याचा हा सोहळा उत्साहाने साजरा करत असून यंदाही परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजा करून बैलांची आरती केली. विशेष करून उच्छभ्रू सोसायटीतील नागरिकांनी सहभाग घेत बैल जोडीचे औक्षण केले.
धकाधकीच्या पुणे शहरात असा पारंपरिक पोळ्याचा जल्लोष नागरिकांसाठी आकर्षण ठरला असून दगडूशेठ गणपती मानाच्या बैलांच्या दर्शनाने भक्तांना खास आनंदाचा अनुभव आला. परिसरात भक्तिमय वातावरण पहायला मिळाले.