लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन, पुणे आणि लक्ष्य फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित
भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आणि युवा नेते केतन भैय्या भगवानराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे : लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन, पुणे आणि लक्ष्य फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आणि युवा नेते केतन भैय्या भगवानराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा उद्देश परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हा होता. सुमारे 1500 नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात पाच वर्षाखालील मुलांचे नवीन आधार, आधार कार्ड नोंदणी व बदल, मोफत औषध वितरण, अस्थिरोग तपासणी, नाक, घसा, कान तपासणी, परिसरातील महिलांची तपासणी, जनरल तपासणी, नेत्र तपासणी, नंबर चष्मे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तपासणीसह विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या. या उपक्रमातून नागरिकांना आरोग्याची योग्य माहिती आणि आवश्यक सल्लाही देण्यात आला.
युवा नेते केतन भैय्या जाधव यांनी या शिबिराबाबत सांगितले, “समाजातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हे आमच्या प्रथमिकतेत आहे. अशा शिबिरांद्वारे आम्ही नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा सहज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढेल आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.”
कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नेते, तसेच आरोग्य तज्ज्ञ सहभागी झाले.परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी प्रशंसा व्यक्त केली आणि पुढील सामाजिक व राजकीय उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना विविध वयोगटात आरोग्य सेवा मोफत उपलब्ध झाल्याबद्दल आभार मानले
