श्री. विशाल मिश्रा, ए.व्ही.पी. ऑपरेशन्स, KARAM Safety

0

पुणे :“स्वातंत्र्य दिन हा केवळ आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर आपल्याला एकत्र आणणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या मूल्यांचाही सन्मान आहे, असे आम्ही KARAM Safety येथे मानतो. या निमित्ताने आमच्या 300 हून अधिक सहकाऱ्यांनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी एकत्र येऊन, त्यानंतर विविध मनोरंजक व उत्साहवर्धक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या उपक्रमांनी केवळ आनंदाची अनुभूतीच दिली नाही, तर परस्परांमधील ऐक्य, स्नेह आणि टीमवर्कलाही बळकटी दिली—सर्व काही आपल्या स्वातंत्र्याच्या उत्सवाच्या भावनेतून.

हा दिवस आपल्या पूर्वजांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची आठवण करून देतो आणि त्याचप्रमाणे आज आपल्यावरही एकत्र येऊन अधिक सुरक्षित, सक्षम आणि लवचिक भारत घडविण्याची सामूहिक जबाबदारी आहे, हे अधोरेखित करतो. आमच्या कार्य आणि संस्कृतीतून आम्ही नेहमीच जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी व देशभरातील समुदायांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »