डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा “महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५” जाहीर, पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियटला २५ मे रोजी भव्य वितरण सोहळा

समाजकार्य, पत्रकारिता, उद्योजकता, शिक्षण आणि सेवाभावी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव

पुणे : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’च्या लोकार्पण सोहळा व ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली.

राजा माने यांनी सांगितले की, “पत्रकारांच्या नव्या पिढीला दिशा देणाऱ्या आणि समाजसेवा, शिक्षण, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार’ दिले जात आहेत. या उपक्रमाचा उद्देश प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देणे आणि नव्या नेतृत्वाला वाव देणे हा आहे.”

या भव्य सोहळ्याचे आयोजन रविवार, २५ मे २०२५ रोजी सायंकाळी JW Marriott, पुणे येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मा. अण्णा बनसोडे (उपाध्यक्ष – महाराष्ट्र विधानसभा) राहणार आहेत. पुरस्कार वितरण मा. जयकुमार गोरे (ग्रामविकास व पंचायतराज मंत्री) आणि डॉ. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष – आयुष्मान भारत मिशन, महाराष्ट्र) यांच्या हस्ते होईल.

“‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ हे केवळ संस्थाच नाही, तर पत्रकारांसाठी मार्गदर्शक आणि समाजासाठी कार्यकर्त्यांची एक चळवळ आहे. पुरस्कार हे फक्त सन्मानाचे साधन नसून, त्यामागे आहे कार्याचा गौरव आणि पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा ठेवा.” या कार्यक्रमात एकूण २५ हून अधिक मान्यवरांना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’, ‘महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार’ व ‘डिजिटल स्टार पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. राजा माने यांनी विशेष उल्लेख केला की, “पुरस्कार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात आली असून, राज्यभरातून आलेल्या विविध नामांकनांवर अभ्यासपूर्वक विचार करुन ही निवड करण्यात आली आहे.”

महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ – पुरस्कार विजेते:

महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५ विजेते

मा. प्राचार्य डॉ. किरण सावे, पालघर – आदिवासी भागातील शिक्षण क्षेत्रात कार्य

बिग हिट मीडिया – अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी – कला व मनोरंजन क्षेत्र

सचिन वायकुळे, बार्शी – तृतीयपंथीय व देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी कार्य

प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कंधार, नांदेड – शिक्षण व ग्रामविकास

उमाकांत मिटकर, नळदुर्ग, धाराशिव – भटक्या-विमुक्त जमातीसाठी कार्य

मोहन डांगरे, सोलापूर – महिला सक्षमीकरण व समाजसेवा

प्रशांत मोरे, महाबळेश्वर – युवा उद्योजक, बांधकाम व सामाजिक कार्य

संजय कोठारी, जामखेड – सामाजिक कार्य

नामदेवराव खराडे, छत्रपती संभाजीनगर – साखर उद्योग

स्वप्निल परदेशी, पाचगणी – चिक्की उद्योग

विजय राऊत, छत्रपती संभाजीनगर – शिक्षण, क्रीडा व साहित्य

संदीप शिंदे, यवतमाळ – बेघर मनोरुग्ण पुनर्वसन

शिवराम घोडके, बीड – प्रगत व सेंद्रिय शेती

आतिश शिरसाट, सोलापूर – बेवारस मनोरुग्ण पुनर्वसन

भास्कर घुले – श्री विघ्नहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक

संतोष ठोंबरे, बार्शी – ग्रामविकास व समाजसेवा

मानसिंगराव चव्हाण, कोरेगाव – सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन

शुभम पसारकर, गडचिरोली – निराधार पुनर्वसन, दिव्यवंदना आधार फाउंडेशन

महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार २०२५

सरिता कौशिक – संपादिका, एबीपी माझा, मुंबई

साहिल जोशी – संपादक, मुंबई तक

संजीव उन्हाळे – ज्येष्ठ पत्रकार, छत्रपती संभाजीनगर

भारत चव्हाण – ज्येष्ठ पत्रकार, लोकमत, कोल्हापूर

दिलीप सपाटे – अध्यक्ष, विधीमंडळ वार्ताहर संघ, मंत्रालय, मुंबई

महाराष्ट्र महागौरव डिजिटल स्टार पुरस्कार

नितीन पाटील – पोलीसनामा

अश्विनी जाधव – लोकमत डिजिटल

अभिजीत दराडे – मटा डिजिटल

विष्णू सानप – लेटसअप डिजिटल

ओमकार वाबळे – मुंबई तक डिजिटल

या पत्रकार परिषदेला संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव महेश कुगांवकर, राज्य संघटक शामल खैरनार, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुबे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार, समाजसेवक, उद्योजक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.

Leave A Reply

Translate »