वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक व ब्युटी स्कूल, पुणे यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

पुणे,:वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक आणि ब्युटी स्कूल, पुणे यांचा भव्य पदवीदान समारंभ पुण्यातील नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आआला होता.सौंदर्य व आरोग्य उद्योगात यशस्वी करिअर घडवण्यासाठी सज्ज होत असलेल्या विद्यार्थ्यांचा व वैद्यकीय तज्ज्ञांचा हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

या समारंभात एकूण 50 विद्यार्थ्यांना विविध कॉस्मेटोलॉजी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर अनेक डॉक्टरांना ऍस्थेटिक मेडिसिन व लेझर टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात आले. ही प्रमाणपत्रे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (यूके) व प्रादेशिक कौशल्य विकास परिषद (दिल्ली) यांनी मान्यताप्राप्त असल्याने जागतिक दर्जाची खात्री मिळते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौंदर्य उद्योगात 15+ वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ, नीरू कुमारी, उपस्थित होत्या. यावेळी सकाळ मीडियाच्या उपसंपादक व श्रमिक पत्रकार संघाच्या सचिव मीनाक्षी गुरव उपस्थित होत्या. त्यांनी महिला सक्षमीकरणावर प्रेरणादायी भाषण देत पदवीधारकांना प्रोत्साहित केले. यावेळी पुण्याचे पॅडमॅन अभिनेते, नृत्यदिग्दर्शक तसेच एक प्रतिष्ठित व महिला सुरक्षा व स्वच्छता यावर आधारित 150+ फॅशन शोचे आयोजक कशीश सोशल फाउंडेशनचे संस्थापक योगेश पवार, , यांनी सौंदर्य व फॅशन क्षेत्रातील मौल्यवान मार्गदर्शन केले. सौंदर्य उद्योगात 15+ वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ, नीरू कुमारी, यांनी विद्यार्थ्यांचे यश व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक व ब्युटी स्कूलच्या संस्थापिका डॉ. अर्चना हर्षद माळी यांनी पदवीधारकांच्या कौशल्याचा गौरव करताना म्हटले की , “जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ही प्रमाणपत्रे त्यांच्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्टतेसाठीच्या समर्पणाचे प्रतीक आहेत.”
या कार्यक्रमात वेलनेस वर्ल्डमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रगत प्रशिक्षणाची व तंत्रज्ञानाची झलक दाखवण्यात आली. सौंदर्य, ऍस्थेटिक्स, व वेलनेस क्षेत्रासाठी कुशल व्यावसायिक तयार करण्याचे संस्थेचे ध्येय स्पष्टपणे दिसून आले.

पदवीधर आता त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात करण्यास सज्ज असून, अनेकांनी भारतातील आणि परदेशातील आघाडीच्या ब्रँड्स व क्लिनिकमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. वेलनेस क्षेत्राला आता दिवसेंदिवस मागणी वाढत असून त्यासाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या अकॅडमी तर्फे वेलनेस क्षेत्रातील स्किन व ब्युटी वर विशेष असे तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. या इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. अर्चना माळी या गेल्या सोळा वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. महिलांना ब्युटी क्षेत्रामध्ये चांगला रोजगार प्राप्त व्हावा हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमासाठी वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक आणि ब्युटी स्कूल, पुणे येथील उत्तीर्ण विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📍 वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक आणि ब्युटी स्कूल, पुणे डेक्कन
📞 संपर्क: 9028235544
Insta id @wellness_world_2918
Website: www.beautycoursepune.com

Leave A Reply

Translate »