राष्ट्रमाता जिजाऊंचे वास्तव्य असलेला पवित्र लाल महाल पुणे मनपाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करणार. पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले.

पुणे: राष्ट्रमाता जिजाऊंचे वास्तव्य असलेला पवित्र लाल महाल पुणे मनपाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करणार असे प्रतिपादन पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन या संघटनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 427व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रमाता जिजाऊंचा इतिहास म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ यांची दूरदृष्टी व त्यांनी छत्रपती शिवरायांवर केलेले संस्कार होय. शिवतीर्थ किल्ले रायगडचा अत्यंत अवघड असा कडा उतरणाऱ्या हिरकनीचा छत्रपती शिवरायांनी केलेला सन्मान हे जिजाऊंनी शिवरायांवर केलेल्या संस्काराचे उदाहरण आहे. असेही ते म्हणाले. या प्रसंगी सौ रत्नप्रभा देशमुख, श्रीमती कमल जाधव, श्रीमती शुभांगी शिवतरे, सौ. नर्मदा कोकाटे, सौ. इंद्रायणी बालगुड़े, श्रीमती संगीता गोळे, सौ.सुशीला खेडेकर, सौ मंगलताई शेवकरी, श्रीमती प्रमिला खांदवे (पाटील), श्रीमती चांगुणाबाई बराटे यांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने अश्विनी नायर यांना कर्तुत्ववान महिला पुरस्कार डॉ.सौ. सीमा गायकवाड (कराडे) व कु.छाया काविरे यांना तर राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार स्नेहल शैलेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमासाठी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, अखिल शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष विकास पासलकर सारथीचे संचालक अशोक काकडे, आमदार बापूसाहेब पठारे, मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डूबल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, रणजित शिवतारे, विठ्ठलराव जाधव, मारुतराव सातपुते, ॲड.मिलिंद पवार, दत्ताभाऊ सागरे, हनुमंत पवार उपस्थित होते. विराज तावरे, निलेश इंगवले, अजिंक्य काळे, रोहित तेलंग, युवराज ढवळे, मुकेश यादव, गणेश चाऱ्हाटे, अक्षय बोरकर, निखिल भस्मारे, अभिषेक वडघुले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रशांत धुमाळ यांनी सूत्र संचलन केले तर कैलास वडघुले यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »