महाराष्ट्रातील पहिले हुनर स्टुडंट कनेक्ट सेंटर पुण्यात सुरू..
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात..
पुणे – भारतातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने निष्ठा योगेश यांनी सहा वर्षांपूर्वी हुनर ऑनलाइन कोर्सेस सुरू केले होते. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून हुनर स्टुडंट कनेक्ट सेंटर पुण्यात सुरू करण्यात आले. वाघोली लोहगाव रोडवर हे केंद्र उघडण्यात आले असून स्टुडंट कनेक्ट सेंटर महिलांना माहिती केंद्र म्हणून मदत करेल. हुनर ऑनलाइन कोर्सेसची विद्यार्थिनी हिमजा स्लाथिया हिच्या पाठिंब्याने, महाराष्ट्रातील पहिले हुनर स्टुडंट कनेक्ट सेंटर तिच्या बुटीकमध्ये सुरू करण्यात आले आहे. हुनर ऑनलाइनच्या सीओ निष्ठा योगेश कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.

हुनरच्या सहयोग व्यवस्थापक विजया दुबे म्हणाल्या की, या उपक्रमांतर्गत, भारतातील विविध राज्यांमधील महिला घरी बसून फॅशन, अन्न आणि सौंदर्य क्षेत्रात त्यांचे कौशल्य विकसित करत आहेत. याद्वारे त्यांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोत देखील मिळत आहे. हुनर ऑनलाइन कोर्सेस फॅशन, फूड आणि ब्युटीशी संबंधित ५५ हून अधिक सरकारी प्रमाणित कोर्सेस शिकवतात. त्यासाठी ऑनलाइन कोर्सेस अॅप्लिकेशनद्वारे महिला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमांचा कालावधी तीन महिने ते सहा महिने असतो आणि महिला त्यांच्या सोयीनुसार त्यांचा लाभ घेऊ शकतात.
इतर संस्थांच्या तुलनेत, हुनर ऑनलाइन अभ्यासक्रम बरेच परवडणारे आहेत, तीन महिन्यांचा अभ्यासक्रम फक्त ३,००० रुपयांमध्ये आणि सहा महिन्यांचा अभ्यासक्रम १०,००० रुपयांमध्ये पूर्ण करता येतो. आतापर्यंत, भारतातील ५०,००० हून अधिक महिलांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत आणि अनेकांनी स्वतःचे व्यवसाय देखील सुरू केले आहेत. या उपक्रमाद्वारे महिलांना दरमहा ६० हजार ते १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. नीता लुल्ला आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती देखील हुनर ऑनलाइन कोर्सेसशी संबंधित आहेत.