टिजीएच आँन्को लाईफ कँन्सर सेंटरच्या डे-केअर केमोथेरपी विभागाचे श्रीमती प्रिया दत्त(खासदार) यांच्या हस्ते उद्घाटन

0

शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (एमजेपीजेएवाय) १२ बेडची सुविधा व मोफत उपचार मिळणार

तळेगाव – ग्रामीण भागातील रुग्णांना उपचाराकरिता शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही याकरिता आपल्या परिसरातच उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न तळेगाव, दाभाडे येथील टिजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने केला जातो.या सुविधांमध्ये आणखी भर पाडत याठिकाणी १२ बेडची व्यवस्था असणा-या डे केअर केमोथेरेपी वार्ड सुरु करण्यात आले असून नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती प्रिया दत्त (खासदार) यांच्या प्रमुख उपस्थितीत या विभागाचे उद्घाटन करण्यात आले

या कार्यक्रमाला श्री गणेश खांडगे( संस्थापक अध्यक्ष- टिजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर), श्री शैलेश शाह(अध्यक्ष- टिजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर), सत्यजित वाढोकर (सचिव- टिजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर), ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑन्को लाइफ हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख तसेच सेंटर हेड डॉ संतोष साहू यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कर्करुग्णांना उपचाराकरिता मदतीसाठी नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या वतीने  विविध उपक्रम राबविले जातात. विशेषतः ग्रामीण भागातील वंचित रुग्णांपर्यत रुग्णसेवा पोहोचविण्याचे कार्य या फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील कित्येक कर्करुग्णांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून उपचारांकरिता मदत मिळाल्याचा प्रतिक्रिया नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती प्रिया दत्त यांनी व्यक्त केली. आँन्को लाईफ कँन्सर सेंटरच्या डे-केअर केमोथेरपी विभागाच्या माध्यमातून कर्करुग्णांना उत्तमोत्तम रुग्णसेवा तसेच आधुनिक उपचारांचा लाभ घेता येणार असून या सेंटरच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 

या प्रसंगी बोलताना सातारा, चिपळूण, तळेगाव (पुणे) आणि वाघोली (पुणे) येथील आमच्या चार केंद्रांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना अनुभवी कॅन्सर तज्ज्ञांद्वारे कर्करोगावर अद्ययावत तत्रज्ञानाव्दारे रूग्णांना उपचार पुरविणार असल्याची माहिती ऑन्को -लाईफचे संस्थापक आणि अध्यक्ष उदय देशमुख यांनी दिली. परवडणा-या दरांत उपचार पुरविण्याचा प्रयत्न आम्ही करत असून ग्रामीण भागातील रूग्णांना कँन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी मोठ्या शहराची वाट न धरता जवळच्या परिसरात या सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे 

श्री उदय देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच प्रिया दत्त यांच्या नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या मदतीने अधिकाधिक रूग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न असेल आणि त्यांचे आभारही यावेळी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »