कोथरुडमधील प्रभाग १३ मध्ये घुमला जय श्रीरामचा नारा

0

चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पारंपरिक वेशात महिला सहभागी

क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि स्थापत्य अभियंता संघटनेचा पाठिंबा

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. या रॅलीत पारंपरिक वेशात महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सु. बे. स्थापत्य अभियंता संघटनेने आपला पाठिंबा पाटील यांना जाहीर केला.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसच बाकी आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना सर्वच स्तरातून व्यापक जनसमर्थन मिळत आहे. जागोजागी होणाऱ्या कॉर्नर सभा, सोसायटी मिटिंग, घरोघरी संपर्क यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध संघटनांकडूनही जाहीर पाठिंबा दिला जात आहे. आज क्रांतीगुरु लहुजी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सु. बे. स्थापत्य अभियंता संघटनेने आपला पाठिंबा पाटील यांना जाहीर केला. संघटनेचे अध्यक्ष पाठिंब्याचे पत्र पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

आज कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत ‘जय श्रीराम’ च्या घोषणेसह हात उंचावून प्रतिसाद मिळाल्याने रॅलीत उत्साह संचारला होता. तर प्रभागातील मंडळांकडून ही पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, या संपूर्ण रॉलीमध्ये अनेक महिला पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या.

एरंडवण्याचे ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली. या रॉलीत भाजपाचे माजी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, अग्रसेन खिलारे, अमोल डांगे, अनुराधा एडके, गिरीश खत्री, मंदार बलकवडे यांच्यासह भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »