ऑलिम्पियाडच्या निकालांमध्ये बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे वर्चस्व

पुणे: गणित विषयातील भारतीय ऑलिम्पियाड पात्रता स्पर्धेत पुणे शहरातून बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवत वर्चस्व निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या IOQM 2024 पहिल्या टप्प्यातील निकालांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. एकूण 59 विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यातील RMO 2024 चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे ऑलिम्पियाड पात्रता स्पर्धेचा विचार केल्यास, बाकलीवाल ट्युटोरियल्स (बीटी) हे महाराष्ट्रातील निःसंशयपणे सर्वोत्कृष्ट आहे. RMO चाचणी रविवार, 3 नोव्हेंबर रोजी नियोजित आहे. RMO चाचणीचा कालावधी 3 तास असेल, 6 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी तपशीलवार पुरावा लिहावा लागेल.

बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वैभव बाकलीवाल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जे विद्यार्थी RMO 2024 साठी पात्र ठरले आहेत त्यांना बाकलीवाल ट्यूटोरियल्सकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बाकलीवाल ट्यूटोरियल्सद्वारे IOQM 2024 च्या निकालांची ठळक वैशिष्ट्ये:
* एकूण निवडी: 59 विद्यार्थी
* श्रेणी B (वर्ग १२): RMO 2024 साठी 16 विद्यार्थी पात्र
* श्रेणी A (वर्ग 9/10/11): 43 विद्यार्थी RMO 2024 साठी पात्र
* पुणे शहरातून सर्वाधिक निवड

Leave A Reply

Translate »