श्रीमद् राजचंद्र मिशनतर्फे पुणे युवा महोत्सव रविवारी (दि.११)

स्वतःशी ओळख हा या महोत्सवाचा उद्देश ; वयवर्षे १६ ते ४० वयोगटातील युवांकरिता आयोजन

पुणे : युवाशक्तीला योग्य गती व दिशा दाखवून देश व समाजाप्रती त्यांच्या मनात चांगली भावना जागृत करण्यासाठी श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर तर्फे पुणे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सनी वर्ल्ड येथे हा महोत्सव होणार असून देशभरातून युवक – युवती यामध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

पूज्य गुरूदेव श्री राकेशजी यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम पुण्यात होत आहे. युवा महोत्सवाचे यजमानपद पहिल्यांदाच पुणे शहराला मिळाले आहे. पुणे युवा महोत्सव हा जागतिक युवा महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या महोत्सवामध्ये अमेरिका, एमिरेट्स, केनिया, सिंगापूर अशा २० देशांमधून ३ हजार पेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन दिले जात आहे.

‘स्वतःशी ओळख’ हा या महोत्सवाचा उद्देश आहे. ज्ञानवर्गामधून आयुष्याचा उद्देश जाणून घेणे, विस्डम मास्टर क्लासद्वारे – मीट यौर पर्पज मुख्य ध्येय निश्चिती, यशासाठी व व्यावहारिक दृष्टिकोन देण्यासाठी द सक्सेस वर्ल्ड टूर अंतर्गत ९ स्टॉल चे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे.

‘सोल्स फॉर सोल्स’ अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबासाठी पादत्राणे बनविण्याचा अभिनव उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यामध्ये युवक – युवतींनी तयार केलेली हजारो पादत्राणे ग्रामीण भागात विनामूल्य देण्यात येतील. तसेच ग्रीन ग्रेनेड्स अंतर्गत हिरव्यागार वातावरणासाठी ‘सीड बॉम्ब’ तयार करणे, हा उपक्रम होईल.

याशिवाय मीट योर पीस अंतर्गत सर्व चिंतांवर चिंतामुक्त असे शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी, चिंतावर मात करण्यासाठी ‘वॉर क्राय’ कार्यशाळेचे आयोजन, मीट यौर कम्पैशन – प्रभाव प्रकल्प आणि निःस्वार्थ सेवेमध्ये सामील होण्याचे आवाहन, ‘मीट यौर स्ट्रेंथ’ – फुटबॉल, बॉक्स क्रिकेट आणि स्विमिंग स्पर्धांमध्ये सहभाग आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्पोर्टर्स आर्केडमध्ये स्पर्धात्मक उपक्रम दिवसभर होणार आहेत.

मीट यौर रूट्स अंतर्गत पी. वाय. एफ कन्सर्ट मध्ये संगीत, नृत्य आणि देवत्वाचा आनंद देखील सहभागींना मिळणार आहे. पॅनेल सिम्पोजियममध्ये सहभाग घेऊन प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांकडून मौल्यवान मार्गदर्शन तसेच समविचारी व्यक्तींसोबत नेटवर्क, विचारांची देवाण-घेवाण करता येणार असून मोठ्या संख्येने युवा वर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Translate »