हे यश जबाबदारी वाढवणारे; सनी निम्हण यांची भावना

पुणे : औंध - बोपोडी ८ प्रभागातील मतदारांनी भरभरून प्रेम दिले आहे, झालेल्या एकूण मतदानांपैकी तब्बल 51 टक्के मतदान माझ्या पारड्यात पडले, मतदारांनी हा दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. आज महापालिका निवडणूकीत मिळालेले यश म्हणजे लोकांनी विकासाला दिलेले मत आहे, हे यश जबाबदारी वाढवणारे असल्याची भावना चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केली. 

पुढे बोलताना ते म्हणाले, औंध – बोपोडी ८ प्रभागच्या विकासासाठी पुढील 100 दिवसांचा रोड मॅप तयार आहे, त्याची अंमलबजावणी येत्या 1 फेब्रुवारी पासून होईल असा मी नागरिकांना विश्वास देतो. माजी कार्यसम्राट आमदार स्वर्गीय विनायक निम्हण आबा यांची पुण्याई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिलेले खंबीर पाठबळ,  भाजपचे असंख्य कार्यकर्ते, आबा प्रेमींची साथ या जिवावर हे यश मिळाले असल्याचेही निम्हण यांनी नमूद केले.

Comments are closed.

Translate »