पालघरचा विशाल वालवी ठरला “सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅान”चा विजेता

पुणे – वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन आयोजित सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅान स्पर्धा पालघरच्या विशाल वालवी याने पुरुषागटात तर स्पृथा पुथरान यांनी महिला गटात जिंकली. यावर्षी जगभरातून ८ देश, भारतातील २४ राज्य व ४५ शहरातून ११ कि.मी., २१ कि. मी., ३० कि.मी., व ४२ कि.मी. अंतर धावण्यासाठी धावपट्टूंनी सहभाग घेतला होता. स्वराज्याचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा सिंहगडाच्या वेगवेगळ्या पाच वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये डोंगर -दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या, आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून चित्तथरारक अनूभव स्पर्धकांना मिळतो. पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनाच्या संदेशाबरोबरच व्यायामाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. स्पर्धेची सुरवात आणि शेवट सिंहगडाच्या पायथ्याला सिंहगड रोपवेच्या ॲाफीसजवळ करण्यात आली.स्पर्धेचे उद्घाटन फ्रांसच्या डेल्फींगेन या कंपनीचे उपाध्यक्ष माननीय डेमियन पेरसोनेनी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक माननीय विलास वहाने, पुणे वनविभागाचे उप वनसंरक्षक माननीय दिपक पवार, सिंहगड रोपवेचे डायरेक्टर माननीय उदयजी शिंदे, पर्यटन विभागाचे प्रमुख, पुणे ग्रामिण पोलिस, घेरा सिंहगड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ, व स्पर्थेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, फाऊंडेशनचे सदस्य मंदार मते, महेश मालुसरे, 

ॲड. राजेश सातपुते, मारूती गोळे, हर्षद राव, अमर धुमाळ 

आणि अनिल पवार यांनी केले होते.वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन दरवर्षी सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅानचे आयोजन जूनच्या अखेरच्या शनिवारी करत असते. सिंहगड एपिक ट्रेल ही स्पर्धा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन बरोबर निगडित आहे. ही चित्तथरारक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या सर्व शूरवीर मावळ्यांना समर्पित करण्यात आली, अशी माहिती संस्थचेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.३५० स्वयंसेवक व मित्र परिवारांनी २ दिवस घेरा सिंहगडमध्ये ठिकठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातवरणात स्पर्धेचे नियोजन केले. दौंड, मुळशी, हवेली, वेल्हा, व पुणे शहरातून आलेल्या Team WGRF च्या मित्र परिवाराने ही स्पर्धा यशस्वी केली.स्पर्धेचा निकाल

पुरूष गट ४२ किलोमीटर
प्रथम क्रमांक – ५.१४.१२ विशाल वालवीद्वितीय क्रमांक – ५.१७.५६ स्टान्झिंग वांगचुकतृतीय क्रमांक – ५.३३.०१ शाश्वत राव

महिला गट ४२ किलोमीटर
प्रथम क्रमांक – ९.४३.०२ स्पृथा पुथरान

पुरूष गट ३० किलोमीटर
प्रथम क्रमांक – ३.३८.०५ विशाल राजबहारद्वितीय क्रमांक – ३.४०.०२ अलबन रोगन फ्रान्सतृतीय क्रमांक – ३.५३.५८ मुकुल दहिया

महिला गट ३० किलोमीटर
प्रथम क्रमांक – ५.३०.४३ ज्युबी जार्जद्वितीय क्रमांक – ६.४०.३२ यंकी धुकपातृतीय क्रमांक – ६.४१.०५ हेलनलुईस वॅाटरहाऊस इंग्लंड

पुरूष गट २१ किलोमीटर
प्रथम क्रमांक – २.३६.११ यशकुमार राजद्वितीय क्रमांक – २.४३.२६ सुरज यादवतृतीय क्रमांक – ३.०५.०४ साहिल भोसले

महिला गट २१ किलोमीटर
प्रथम क्रमांक – ४.१२.५१ रिया प्रधानद्वितीय क्रमांक – ४.२१ निधी टुलीतृतीय क्रमांक – ४.३३.४५ सीमा बलिगा

पुरूष गट ११ किलोमीटर
प्रथम क्रमांक – १.२३.१७ जस्टिन बेचेरास फ्रान्सद्वितीय क्रमांक – १.२३.१८ तनय कचरेतृतीय क्रमांक – १.२६.१३  महेश गुप्ता

महिला गट ११ किलोमीटर
प्रथम क्रमांक – २.०३.४६ राखी गुप्ताद्वितीय क्रमांक – २.०४.५८ रचना रोकडेतृतीय क्रमांक – २.०५.२३ सायली पिलाने

Leave A Reply

Translate »