संचालकांनी  निरपेक्ष भावनेने काम केले तर कोणतीही सहकारी बँक बुडत नाही – सुभाष मोहिते यांचे मत 

जिजामाता महिला सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता 

पुणे :  सहकारी बँकेत जे लोक पैसे ठेवतात ते त्या बँकेच्या संचालकांची  समाजात काय पात्रता आहे त्या बँकेचा कारभार कसा  आहे? यावर पैसे ठेवतात. तर नॅशनल किंवा प्रायव्हेट बँका यावर सरकारचा वरदहस्त आहे यामुळे पैसे ठेवतात यामुळे सहकारी संस्थाच्या  संचालकांनी मालक म्हणून काम न करता विश्वस्त म्हणून काम केले तर त्या संस्था टिकतात किंबहुना चांगल्या चालतात. संचालकांनी  निरपेक्ष भावनेने काम केले तर कोणतीही सहकारी बँक बुडत नाही असे मत  पुणे जिल्हा ना.सह. बँक्स् असो. लि. चे अध्यक्ष सुभाष मोहिते यांनी व्यक्त केले. 

जिजामाता महिला सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ सोहळ्याचे आयोजन आज राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथि निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे करण्यात आले होते. यावेळी कारूयाकरमाच्या अध्यक्षस्थानावरून मोहिते बोलत होते.  याप्रसंगी डॉ . यशवंत पाटील डायरेक्टर, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ को-ऑप. मॅनेजमेंट, अरविंद नाईक , सहायक मॅनेजर (निवृत्त), आर.बी.आय., विद्याधर अनास्कर बँकींग तज्ज्ञ तथा प्रशासक महाराष्ट्र राज्य सह. बँक, रत्नमाला म्हस्के अध्यक्षा जिजामाता महिला बँक,  सुरेखा शितोळे उपाध्यक्षा उमाकांत मुंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, निलम पिंगळे, सहायक उपनिबंधक यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरनिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

पुढे बोलताना मोहिते म्हणाले, नागरी सहकारी बँका चालवणे अत्यंत अडचणीचे आहे, स्मॉल फायनान्स, प्रायव्हेट बँका यांचे आव्हान आज सहकारी बँकांसमोर निर्माण झालेले आहे. जुन्या पिढीला जपण्या बरोबरच नवीन पिढीला आपल्याशी जोडण्याचे मोठे आव्हान आज सहकारी बँकांसमोर आहे. हे आव्हान ज्या बँकाना   पेलले त्या  टिकल्या आहेत ज्यांना बदल झेपले नाहीत अशा अनेक बँका या बाहेर पडल्या आहेत. 

विद्याधर अनास्कर म्हणाले, मालतीताई आणि माधावराव शिरोळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या 300 व्या जयंती महोत्सव समितीच्या काऱ्यातून प्रेरणा घेऊन बँकेची स्थापना केली.  50 वर्षे हा मोठा कालावधी आहे, बँकेची स्थानना ज्या हेतूने झाली होती तो हेतु साध्य झाला का ? याचा विचार संचालकांनी या निमित्ताने करावा, तो करताना चांगल्या आणि चुकीच्या अशा दोन्ही बाजूनचा विचार व्हावा आणि चुकांची पुनरावृत्ती टाळावी असे आवाहन त्यांनी केले. 

या प्रसंगी मंगलदास बांदल, स्मिता शिरोळे,  अॅड. श्रीपाद खुरजेकर, अशोक काकडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच बँकेशी संबंधित आणि ऋणानुबंध जपणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेच्या अध्यक्ष रत्नमाला म्हस्के यांनी केले, आभार उपाध्यक्षा सुरेखा शिरोळे यांनी मानले.

Leave A Reply

Translate »