जैविक निविष्ठा ब्रँड इनेराने एम एस धोनीला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे

इनेरा- कृषी जैवविज्ञान विकसित करणाऱ्या सखोल R&D बायोसायन्स फर्मने एमएस धोनी यांना त्यांचा
ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून, धोनी जनतेपर्यंत शाश्वत जैव
निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देऊन कृषी परिवर्तनास समर्थन देईल.
सहयोगाबद्दल विचार करताना, धोनी म्हणाला, “जैव-शेतीसाठी इनेराची दृष्टी आणि उपाय परिवर्तनकारी
आहेत आणि मला या बदलाचा पुरस्कार करताना अभिमान वाटतो. शेती नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ
आहे आणि मी लाखो शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी उत्सुक आहे. इनेराद्वारे जाहीर केलेल्या उच्च
कार्यक्षम उत्पादनांचा वापर करून प्रगतीशील कृषी पद्धतींचा अवलंब करा.”
शेतीतील रासायनिक निविष्ठांसाठी शाश्वत पर्याय म्हणून कृषी जैविक शास्त्र जागतिक स्तरावर वर्चस्व
मिळवत आहे आणि तसेच कठोर पर्यावरणीय नियमांमुळे आणि सेंद्रिय उत्पादनांसाठी वाढत्या ग्राहकांच्या
मागणीमुळे, आशिया-पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिकेत लक्षणीय वाढीसह, उत्तर अमेरिका आणि युरोप
सारखे प्रदेश आत्मसाद करण्यात आघाडीवर आहेत.
भारत सरकारच्या अलीकडील धोरणात्मक उपक्रम जसे की परमपरागत कृषी विकास योजना (PKVY) जैव
निविष्ठांना प्रोत्साहन देणे आणि ते स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे.
तथापि, भारत जैव निविष्ठांमध्ये वाढती स्वारस्य दाखवत असताना, उत्पादनाच्या दृष्टीकोनातून एक त्रुटी
अजूनही आहे. पारंपारिक जैव निविष्ठामध्ये साठवणूक क्षमता आणि परिणामकारकता यामध्ये समस्या
असल्याचे ओळखले जाते आणि ते कार्यप्रदर्शन आणि प्रभावाच्या दृष्टीने मर्यादित असतात.
इनेरा पिकांची काळजी आणि संरक्षणामध्ये शाश्वत उपाय जाहीर करते की, ज्यामध्ये जैव खते,
बायोस्टिम्युलंट्स आणि बायोकंट्रोल्स समाविष्ट आहेत. शेतकरी आणि वितरकांना सामान्यतः
भेडसावणाऱ्या साठवणूक क्षमता, स्थिरता आणि परिणामकारकता यासह विशिष्ट समस्यांचे निराकरण
करण्यासाठी इनेराची उत्पादने मालकी तंत्रज्ञानासह तयार केलेली आहेत. या जैविक द्रव्यांची २.५ दशलक्ष
चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या कंपनीच्या फील्ड ट्रायल सुविधांमध्ये अनेक कृषी हवामान परिस्थितींमध्ये
मोठ्या प्रमाणावर चाचणी केली गेली आहे, जी भारतातील जैविक शास्त्रांसाठी सर्वात मोठी अशी व्यवस्था
आहे.
“एमएस धोनीला आणताना, आम्ही शाश्वत शेतीसाठी त्यांच्या सादरीकरणाबाबत स्वागत करत आहोत,”
असे संस्थापक आणि समूह सीईओ, अगम खरे म्हणाले, आणि पुढे ते म्हणाले की, “ग्रामीण भारतातील

धोनीची अतुलनीय पोहोच आणि शेतीसाठीची त्याची वचनबद्धता जैव निविष्ठांचा व्यापक अवलंब
करण्यात आणि भारताच्या कृषी पराक्रमाला पुनरुज्जीवित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”
इनेराबद्दल
इनेरा ही एक बायोसायन्स कंपनी आहे, जी मानवतेची अनंतकाळपर्यंत भरभराट होण्यासाठी शेतीच्या
शक्तीचा उपयोग करते. जीवशास्त्राचे सखोल ज्ञान वापरून तयार केलेल्या क्रांतिकारी १०० % जैव-सक्षम
कृषी निविष्ठाद्वारे इनेरा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे आरोग्य आणि गुणवत्ता वाढविण्यात मदत करते.
जागतिक दर्जाचे जागतिक संशोधन कौशल्य, विकास सुविधा आणि चाचणी या पायाभूत सुविधांद्वारे
समर्थित, इनेराच्या प्रगत तंत्रज्ञान – बायोफर्टिलायझर्स, बायोस्टिम्युलंट्स आणि बायोकंट्रोल्स, विज्ञान
आणि नैसर्गिक शक्तिशाली प्रणालींमधील सुवर्ण संतुलन पुनर्संचयित करत आहेत.
इनेराद्वारे प्रगतीशील शाश्वत शेती सार्वत्रिक बनवत आहे. प्रत्येक एकरावर आणि जागतिक स्तरावर.

Leave A Reply

Translate »