डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्यामार्फत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी मोफत पॅप स्मीअर चाचणी शिबिराचे आयोजन

पुणेडॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयरुग्णालय आणि संशोधन केंद्रपिंपरीपुणे, यांच्यावतीने महिलामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबतीत प्रतिबंधात्मक उपचार व या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशाने पुणे आणि पिंपरी परिसरातील महिलांसाठी मोफत ‘पॅप स्मीअर‘ चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी  या वेळेत डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या हायटेक इमारतीतील पहिल्या मजल्यावरील ओपीडी ५ मध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी विभागाचे प्रमुख  प्राध्यापक डॉहेमंत देशपांडे व त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे.

शिबिरादरम्यान रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स हे उपस्थित राहून गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगासंबंधी मोफत सल्ला आणि मार्गदर्शन प्रदान करतील.

गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची तपासणी करून घ्यावी प्रतिबंधात्मक उपचार, निदान व समुपदेशन आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

जन आरोग्याचे हित साध्य करीत रुग्णालय कर्करोग जनजागृतीच्या ध्येय समोर ठेवून मोफत पॅप स्मीअर स्क्रीनिंग तपासणी सह समुपदेशन करीत आरोग्य सेवा देत निरोगी आरोग्याला प्रोत्साहन देत आहे.

तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराचे तपशील 

काय: मोफत पॅप स्मीअर चाचणी शिबिर

कधी: सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी

वेळ: सकाळी १० ते दुपारी १

पत्ता: स्त्री रोग व प्रसूती शास्त्र, बाह्य  रुग्ण विभाग ओ पी डी क्र ५ हायटेक इमारत, डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे,

Leave A Reply

Translate »