पुणे: रूबी हॉल क्लिनिक च्या वतीने हॉटेल रित्झ कार्लटन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. रुबी हॉल क्लिनिक चे प्रमुख डॉ .परवेझ ग्रँट, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, बेहराम खोडाईजी उपस्थित होते.
रुबी हॉल क्लीनिकने कर्क रोग उपचारा साठी अत्याधुनिक साबरनाईफ हे मशीन आणले आहे , या साबरनाईफ मशीन मुळे कर्क रोग उपचारात क्रांती आणली आहे. यातूनच भारत मेडिकल टुरिझम या विषयात अग्रेसर होत आहे ,मेडिकल टुरिझम मधील संधी ओळखत नवे धोरण आणणार असल्याचे नाईक म्हणाले, या साठी लवकरच पायाभूत सुविधाची गरज ओळखून पुण्यातील अंतराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावीत असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते पुण्यातील टर्मीनल चे उद्घाटन लोकसभा निवडणूकीआधी होईल अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
श्रीपाद नाईक म्हणाले,’ रूबी हॉल क्लिनिक चे नाव ऐकून होतो. हे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. केंद्र, राज्य सरकार पाठीशी राहील. विमानतळाचा विस्तार आणि विकास करून हे टुरिझम पुढे नेले जाईल. भारत पुढे जाऊन मेडिकल हब होईल. सर्व सोयी उपलब्ध होतील, जगातील स्वस्त उपचार येथे होतील. वेलनेस सेंटर होईल. जगाला सुखी करण्याचा प्रयत्न होईल. आयुषच्या माध्यमातून पारंपारिक उपचार पुढे येत आहेत. प्रसार माध्यमातून सकारात्मकता पुढे येत आहे. वैद्यकीय सेवेतून श्रीमंत होणे हा उद्देश नसतो, सेवा हाच उद्देश असतो. रुबी हॉलचे प्रयत्न देखील त्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कमी खर्चात चांगली सेवा देता यावी, देशाचे नाव त्यातून मोठे होईल. या साठी या क्षेत्रातील सर्व संस्थांनी आपला वाटा उचलावा.असा विश्वास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला .
