‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘सक्षम सखी सहेली’ प्रदर्शन

पुणे ः एम.आय.टी. आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे, ‘स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च’ विभागाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त महिला सक्षमीकरणासाठी ‘सक्षम सखी सहेली’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे शहराच्या माजी महापौर सौ.वैशालीताई बनकर आणि हडपसर विभागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पल्लवी ताई सुरसे, तसेच विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण आणि डॉ. प्रिया सिंग, अधिष्ठाता, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस तसेच विविध विभागाचे अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत पार पडला.या प्रदर्शनात पुणे शहरातील विविध भागातून महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे जसे की, आकाश कंदील, सुबक पणत्या, तोरणे, पूजेसाठी लागणारे साहित्य, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, कपडे, खते, शोभेची झाडे, चॉकलेट्स, फराळाचे पदार्थ इत्यादीचे तब्बल ३० हून अधिक स्टॉल्स लावले गेले होते. यामध्ये स्टॉल धारकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच त्यांना मिळणारी ग्राहकांची पसंती आणि प्रतिसाद हा देखील भरघोस होता. विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देऊन व विविध वस्तूंची खरेदी करून स्टॉल धारकांचा उत्साह वाढविला.

Leave A Reply

Translate »