समाजात मानसिक आजारांची जाणीव व जागृती आवश्यक मानसोपचार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांचे विचार ‘जाणीव तुमच्या आमच्या संवेदनांची’ पुस्तक प्रकाशन

पुणे:” एखाद्या माणसाला मानसिक आजार झाला की त्या व्यक्तीकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोण बदलतो. त्याला वेडं ठरविण्यात येते. तसे नसून तो एक वेळेत बरा होणारा आजार आहे .तुमच्या आमच्या मध्ये या संवेदनांची जाणीव व जागृती होणे आवश्यक आहे.” असे विचार वरिष्ठ मानासोपचार तज्ञ व भारतीय मानसोपचार संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर वाटवे यांनी व्यक्त केले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, साहित्यविश्व प्रकाशन, पुणे आणि मनोब्रम्हा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक डॉ. किरण चव्हाण व डॉ. सुप्रिया चत्तर चव्हाण यांच्या मानसिक आरोग्यावर आधारीत ‘जाणीव तुमच्या आमच्या संवेदनांची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी वरिष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, पुणे शहराच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रूक्मिणी गलंडे, मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ.अमृता ओक व साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम मालन आप्पासो शिंदे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मनोब्रम्हा फाउंडेशन व संवाद पुनवर्सन केंद्राचे संस्थापक डॉ. किरण चव्हाण व डॉ. सुप्रिया चत्तर चव्हाण हे उपस्थित होते.डॉ. विद्याधर वाटवे म्हणाले,” लेखक स्वतः मानसिक रोगांचे डॉक्टर असल्याने ते पोलिस, होमगार्ड आणि सर्व लोकांमध्ये या आरोग्यबद्दल जनजागृतीचे कार्य करीत आहेत. मानसिक आजारांवरील पुस्तके बहुतेक वेळा रूक्ष होऊ शकतात पण डॉ. किरण यांनी उदाहरणाच्या माध्यमातून आजारांची संपूर्ण माहिती सोप्या शब्दांमध्ये मांडली आहे. जे समाजासाठी उपयुक्त असे पुस्तक आहे.”

लेखक डॉ. किरण चव्हाण म्हणाले,”समाजात वाढत जाणार्‍या मानसिक आजरासंदर्भात जागृती करण्यासाठी या पुस्तकांची रचना केली आहे. पुनर्वसन केंद्रामध्ये आलेल्या आजारी रुग्णांची माहिती गोष्टीच्या स्वरूपात नोंदविल्या आहेत. यात आजार, उपचार आणि जागृती ही या मागची संकल्पना आहे.” डॉ. उल्हास लुकतुके म्हणाले,”

आरोग्य ही संकल्पना खूप वेगळी आहे. यामध्ये रोग नाही ती स्थिती म्हणजे आरोग्य. ज्या वेळेस स्वस्थची ओळख होईल त्यावेळेस आपल्याला स्वास्थ्याची जाणीव होईल.रूक्मिणी गलंडे म्हणाल्या,” डॉक्टरांना परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. पोलिसांवरील वाढता तनाव म्हणजेच स्ट्रेस कमी करणे गरजेचे आहे. ते सतत गुन्हेगार व समाजातील वातावरण शांत ठेवण्यासाठी कार्यरत असतात.

अशा वेळेस त्यांना एखाद्या मानोसपचार तज्ञाच्या माध्यमातून सामाजिक व मानसिक आजाराची माहिती देणे गरजेचे आहे.”विक्रम मालन आप्पासो शिंदे म्हणाले,” मानसिक आरोग्य सांभाळणे ही काळाची गरज आहे. बाह्य जगाच्या वातावरणाच्या प्रभावात प्रत्येक वयोगटातील व्यक्ती भरकटला आहे. जाणीव संवेदनाची पुस्तक निर्मितीत समाजातील वास्तव स्वरूप मांडले आहे. यातील केस स्टडी या संपूर्ण मन हेलाविणार्‍या आहेत. जेव्हा लहान मुले व्यसनाधीन होतात तेव्हा संपूर्ण कुटुंब कसे नष्ट होते याचे जीवंत उदाहरणांची नोंद यात नोंदविल्या गेली आहे.”यानंतर डॉ. अमृता ओक यांनी विचार मांडले. तसेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी विडियोच्या माध्यमातून पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुद्रित शोधक विजय जोशी व आर.के. मिडियाचे संचालक रामहरी कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच हा कार्यक्रम मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन असेंबली सभागृहात पार पडला.डॉ. श्रध्दा चाकरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Translate »