अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे- डीएसएम इंडिया आणि वनराई संस्थेच्या वतीने व साम्राज्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण सह्याद्री हॉस्पिटलसाठी करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटल आणि साम्राज्य प्रतिष्टान यांच्या सहकार्यातून या ऍम्ब्युलन्सचा वापर समाजातील गोरगरीब घटकांसाठी केला जाणार आहे. यामध्ये पुण्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांनासुद्धा सेवा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

यावेळी डीएसएम इंडियाचे व्यवसाय संचालक निलेश कुकलेकर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील, सह्याद्री हॉस्पीटलच्या डेप्युटी जनरल मॅनेजर स्नेहल साहू, चीफ मार्केटिंग ऑफिसर मनीष राय, राकेश शेलार उपस्थित होते. मंगेश काळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन नितीन पाठक केले.

रवींद्र धारिया म्हणाले की, वनराई संस्थेमार्फत पर्यावरण संवर्धन, खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असताना आरोग्य या घटकावर देखील भर दिला जतो. यादृष्टिकोनातून ग्रामीण आदिवासी भागामध्ये आरोग्यविषयक मूलभूत सोय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वैद्यकीय चिकित्सा व उपचार शिबिरांचे आयोजनही सातत्याने केले जात असते. या उपक्रमासाठी समाजातील संवेदशील व्यक्तींकडून किंवा डीएसएम सारख्या कंपन्याकडून केलेली मदत तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी वनराई संस्था नेहमी कटिबद्ध असते. जास्तीत जास्त लोकांना संकटावेळी जीव वाचवता यावेत यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

निलेश कुकलेकर म्हणाले की, विविध कंपन्यांसाठी आपल्या उत्पन्नातील ठराविक निधी हा सामाजिक दायित्व (सीएसआर)साठी खर्च केला जावा यासाठी सरकारने कायदा केला. मात्र हा कायदा येण्याआधीपासूनच आम्ही आमची सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे. समाजासाठी विविध उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो. अत्याधुनिक रुग्णवाहिका अर्पण करतेवेळी आपण कोणाचातरी जीव वाचविणार हि पुण्य भावना वाटत आहे.

महेश पाटील म्हणाले की, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आपण नेहमीच वाचत असतो. जगामध्ये भारताची लोकसंख्या जास्त आहे. सर्वच रुग्णांसाठी विविध पातळीवर मदत करण्यासाठी सरकार कमी पडू शकते. रस्ते अपघात असो कि आपत्कालीन सेवा वेळेवर जीव वाचविणारी, रुग्णाला आधार देणारी जीवन वाहिनी म्हणजेच रुग्णवाहिका आहे. सह्याद्री हॉस्पिटलला उपचारांसाठी दाखल होणाऱ्या गरजू रुग्णांच्या सेवेसाठी साम्राज्य प्रतिष्टानच्या सहकार्याने हा उपक्रम राबविणार आहोत.

स्नेहल साहू म्हणाल्या की, समाजातील गोरगबीर व गरजू लोकांना जास्तीत जास्त या रुग्णवाहिकेचा लाभ सह्याद्री हॉस्पिटलद्वारे देण्यास आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. नागरिकांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा व सेवा पुरविण्याच्या दृष्टीने रुग्णवाहीच्या ताफ्यात आणखीन एक अत्याधुनिक रुग्णवाहिका आल्याने आनंद होत आहे.  कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर आणि पल्मोनोलॉजी, इंटर्नल मेडिसिन, न्यूरोलॉजी, इंटरव्हेन्शनल नयूरॉलॉजी आणि न्युरोसर्जरी, जनरल सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट, ट्रॉमा आणि ऑर्थोपेडिक सर्जरी, ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि इतर उपचारासाठी गरजू नागरिक सह्याद्री हॉस्पिटलशी अजून चांगल्या पद्धतीने जोडले जातील.

Leave A Reply

Translate »