इंडोटेक इंडस्ट्रीजच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शाखा क्रमांक 2 चा उद्घाटन सोहळा

इंडोटेक इंडस्ट्रीजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब जंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त

अनाथ मुलांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे -इंडोटेक इंडस्ट्रीजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब जंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंडोटेक इंडस्ट्रीजच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शाखा क्रमांक 2 चा उद्घाटन सोहळा अनाथ मुलांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमानिमित्त वर्षा पड्याळ व अशोक जाधव या दिव्यांग गायकांच्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब जंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी निमंत्रित कवींचे काव्य संमेलन व इंडोटेक इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रभुजाचक ,नवनाथ खरात ,राहुल चव्हाण, विभीषण पोटरे या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.याप्रसंगी प्रसिद्ध कवी व निवेदक राजेंद्र सरग, इंडोटेक इंडस्ट्रीजच्या संचालिका हेमलता जंजिरे, भाऊसाहेब जंजिरे यांचे वडील बापूराव जंजिरे , आई लक्ष्मी जंजिरे यांच्यासह अनेक विविध सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भाऊसाहेब जंजिरे यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.इंडोटेक इंडस्ट्रीज आतापर्यंत वायरोनील , सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर,सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, इ गार्बेज रिक्षा,गार्बेज ट्राय सायकल, मृत जनावरांची विद्युत दाहिनी आदी विविध उपकरणे समाज उपयोगी कामांसाठी बनविण्यात आली आहेत. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी इंडोटेक इंडस्ट्रीज नेहमीच पुढाकार घेतला असून कोरोना काळातही अनेक संस्थांना कोरोना किलर मशीन बसविण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकांमध्येही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आली आहेत. आगामी काळातही इंडोटेक इंडस्ट्रीज कडून अनेक सामाजिक सहयोगातून विविध उपकरणे तयार करण्याचा मानस आहे. असे यावेळी बोलताना भाऊसाहेब जंजिरे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले.

Leave A Reply

Translate »