डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ४० वर्षीय ब्रेन डेड माणसाने अवयवदाना द्वारे तीन जणांचे वाचवले जीव

DPU प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने बहु-अवयव प्रत्यारोपणामध्ये आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे

४ मे रोजी रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४० वर्षीय तरुणाला २९ मे रोजी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याचे अवयव दान करण्यात आले. कुटुंबीयांच्या संमतीनंतर त्या व्यक्तीने आपले हृदय, २ मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड आणि २ कॉर्निया दान केल्याने तीन लोकांचे प्राण वाचले आहेत.

गुंतागुंतीच्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने अहमदनगर येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षांच्या तरुण पुरुषाचे प्राण वाचवण्यात आले, जो टाईप १ मधुमेहाने सीकेडी (क्रॉनिक किडनी डिसीज) ने ग्रस्त होता. त्यावर किडनी आणि स्वादुपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. तो ७ वर्षांपासून प्रतीक्षा यादीत होता. दुसरे ५० वर्षांचे पुरुष, शेवटच्या टप्यात यकृत आणि किडनीच्या जुनाट आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया एकाच छताखाली आणि त्याच दिवशी यशस्वीपणे पूर्ण झाल्या, ज्यामुळे संस्थेसाठी आणखी एक महत्त्वाची कामगिरी नोंदवली गेली. पुणे ZTCC वाटप निकषांनुसार डीपीयु प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन रुग्णांना किडनी आणि स्वादुपिंड व मूत्रपिंड आणि यकृताचे वाटप करण्यात आले. आणि पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात एका रुग्णाला हृदयाचे वाटप करण्यात आले.

“४० वर्षांच्या दात्याचा ऑफिसला जात असताना अपघात झाला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्याने जीव वाचवण्याचा प्रयत्न खूप केला. रुग्णाच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. ही घटना कुटुंबासाठी अनपेक्षित आघात होता पण मानवतेसाठी आणि अवयव निकामी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी कुटुंबाने अवयवदानाचा हा धाडसी निर्णय घेतला”, डॉ. वृषाली पाटील, प्रोग्रॅम डिरेक्टर, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी सांगितले.

डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे, यांनी आव्हानात्मक प्रकरणे हाती घेतल्याबद्दल आणि क्लिनिकल उत्कृष्टता प्राप्त केल्याबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक केले. एकाच छताखाली एकाच वेळी दुहेरी प्रत्यारोपण करण्याची गेल्या ६ महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. त्यांनी नमूद केले की, “डीपीयूमध्ये अवयव दानाबद्दल जनजागृती आणि शिक्षित करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.”

“जशी जागरूकता वाढते तसतशी अनेक कुटुंब आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करण्यासाठी पुढे येत आहेत. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पुण्यातील एकमेव खाजगी रुग्णालय आहे ज्याला विविध बहु-अवयव प्रत्यारोपणाचे श्रेय दिले जाते, आम्ही अवयव दान आणि प्रत्यारोपण सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे सुरू ठेवले आहे”, डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डीवाय पाटील विद्यापीठ सोसायटी म्हणाले.

Leave A Reply

Translate »