‘मराठी पाऊल पडते पुढे’ …. ५ मे रोजी प्रदर्शित होणार

5 मेच्या मुहूर्तावर अभिनेता चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे टाकणार एक पाऊल पुढे….

चित्रपटाच्या 100% निव्वळ नफ्याचा विनियोग चित्रपटातील कलाकार आणि समाजकार्यासाठी –

निर्माता प्रकाश बाविस्कर;

पुणे: मराठी मालिका विश्वातून थेट 83 (एटी थ्री) ह्या बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ रुपेरी वाळूत सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या लव्हस्टोरीने सजलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा 5 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने चिराग आणि सिद्धी हे प्रथमच एकत्र आले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला हवा असलेला आणि ह्या सिनेमाच्या कथानकाला साजेसा असा उंच शरिरयष्टी आणि देखणा नायक चिरागच्या रुपाने मिळाला आहे. म्युझिक अल्बमच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली सौंदर्यवती सिद्धी पाटणेची रोमँटीक साथ चिरागला लाभली आहे. रीयल लाईफमध्ये स्टाईल आयकॉन असणाऱ्या ह्या दोन्ही कलाकारांची मराठी पाऊल पडते पुढे ह्या सिनेमातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहाणं औत्सुक्याचे ठरेल.

नुकताच ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते दि. १३ एप्रिल २०२३ रोजी दादर येथे करण्यात आला. “मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली. आयुष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. निर्माते प्रकाश बावीस्कर हे माझ्या जिल्ह्यातील आहेतच पण माझे चांगले मित्रही आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.” असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यानिमित्त काढले. त्याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकऱ्या देणारा होऊ शकतो असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी मला आशा आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ निर्माता प्रकाश बाविस्कर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या सोबत आहे, अशी ग्वाही श्री. सुरेश हावरे यांनी ह्या प्रसंगी दिली.

ह्या चित्रपटाचा आशय आणि मूळ उद्देश पाहून पुणे येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. एस. आर. कुलकर्णी हे चित्रपटाला जाहीर पाठींबा दिलेला आहे. त्याच बरोबर मगरपट्टा टाऊनशीप डेव्हलपमेन्ट अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे संस्थापक-संचालक श्री. सतीश मगर यांचा उदात्त स्नेहभाव व आशीर्वाद ह्या चित्रपटाला लाभला असून त्यांनी ह्या चित्रपटाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. श्री. प्रकाश बाविस्कर हे माझे मित्र आहेत, ते प्रसिद्ध विकासक असून शिवलाईन फिल्मस च्या माध्यमातून त्यांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे ‘ या एका सामाजिक चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आपल्या तिकिटाचा पैसा हा समाजसेवेसाठीच आहे, म्हणून हा चित्रपट आपल्याला पाहावा लागेल, असे आवाहन त्यांनी केलेले आहे.

तसेच खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंच पुणे च्या वतीने या चित्रपटाला शुभेच्छा देण्यसाठी श्रीमती विजयाताई मानमोडे यावेळी उपास्थित होत्या.

मराठी पाऊल पडते पुढे हे शीर्षक वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते. असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या अनेक मराठी दिग्गजांनी जगाच्या नकाशावर आपली पताका डौलाने फडकवली. पण, तरीही एकूण मराठी भाषिकांमध्ये व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करण्याची वृत्ती नसते, असा एक ढोबळ समज आहे. अर्थात, त्याला अनेक कारणे असू शकतात. स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे, आणि तो करण्यासाठी आजचा मराठी तरूण कुठेही कमी नाही. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची गरज आहे. ही गरज, प्रेरणा आणि उर्जो प्रभावी मनोरंजनाद्वारे देण्यासाठी तसेच समस्त मराठी मन आणि मनगटे मजबूत करण्यासाठी निर्माता प्रकाश बाविस्कर यांची निर्मिती व शिवलाईन फिल्म्सची प्रस्तुती असलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट ५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मराठी तरुणाांना व्यसायाकडे वाटचाल करण्याकिरीता प्रोत्साहन देणारा आणि संघर्षातून यश कसे प्राप्त करता येते याचे मार्गदर्शन करणारा हा चित्रपट आहे.

निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो. हे प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करुन येन केन प्रकारे उभरत्या व्यवसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या निव्वळ नफ्यातील दहा टक्के रक्कम कलाकारांना आणि उर्वरीत भाग हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी आणि वृध्दाश्रमासाठी देऊ केला आहे, म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला पाहावाच लागेल. त्याचबरोबर चित्रपटाचे लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५ ४४ ११ ३३ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन निर्माता श्री. प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे.

अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्नील मयेकर लिखित-दिग्दर्शित तसेच चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच मराठी तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि भविष्याप्रती जागरुक करणारा ठरेल.

Leave A Reply

Translate »