सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सने केले दिव्यांग मुलांसोबत नववर्षाचे स्वागत

‘जल्लोष २०२३’ने भारावली दिव्यांग मुले

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत दिव्यांग मुलांसाठी ‘जल्लोष २०२३’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाणी, नृत्याविष्काराचे सादरीकरण, भरपूर खाऊ आणि फुग्यांची उधळण यामुळे ही दिव्यांग मुले भारावून गेली. कार्यक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते गुणी मुलांचे कौतुक करण्यात आले. प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल सुनील चेकर, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके आदी उपस्थित होते. दिव्यांग मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी 

सुहास शाहू पाटील (कर्णबधिर) ड्रॉइंग व पेंटिंग, सुप्रिया दिलीप गायकर (मतिमंद) आंतरराष्ट्रीय खेळाडू, दिपाली उद्धव हराळे (गतिमंद) प्रशिक्षक, देवाशिष सापटनेकर (मतिमंद) गायन व वादन, चैतन्य म्हेत्रे (मतिमंद), प्रीती राजू सोरटे (मतिमंद) नृत्य, योगेश शिंदे (मतिमंद) ऑफिस सहाय्यक, जुलेखा शेख (मतिमंद) आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुष्पक सोलंकी (कर्णबधिर) ज्युदो व कराटे, मुस्कान जकिर शेख (मतिमंद) स्केटिंग व वाद्यवादन, आशिष नेमाणे (मतिमंद) कला व क्रीडा, दुर्गेश अमोल कांबळे (मतिमंद) राष्ट्रीय खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सर्व मुलांचे स्वागत केले. “दिव्यांग मुलांना ईश्वराने एक वेगळी शक्ती दिली आहे. त्यांनाही सर्वसामान्य मुलांप्रमाणे सर्व गोष्टी करता याव्यात, सन्मानाने जगता यावे, यासाठी काम करत असलेल्या संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे. या मुलांमध्ये उंच भरारी घेण्याची क्षमता आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्वरूपाचे कार्यक्रम उपयुकत ठरतात. ‘सूर्यदत्त’ परिवार या मुलांसाठी सदैव कर्तव्य भावनेने काम करण्यास सज्ज आहे. ‘सूर्यदत्त’ शाळेतील मुलांनीही या मुलांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, याचा आनंद वाटतो.”

रमेश शहा म्हणाले, “लायन्स क्लब व सूर्यदत्त संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी चांगले व्यासपीठ दिले जात आहे. या मुलांना आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करण्याचा वाव ‘जल्लोष’ कार्यक्रमातून दिला जातो. सामाजिक जाणिवेतून ज्ञानदानाचे काम करत असलेल्या प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे कार्य दिशादर्शक आहे.”

विविध १२ संस्थांचे ३०० विद्यार्थी व शिक्षक यात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी कार्टून, फुगे व त्याबरोबर फोटोचा आनंद घेतला. मुलांना कोरोना प्रतिबंधक किट, मास्क, सॅनिटायझर, लिक्विड सोप आदी वितरित करण्यात आले. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादर केले. सीमा दाबके यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

———————————-

६९४ : बावधन : दिव्यांग मुलांसाठी आयोजित ‘जल्लोष’ कार्यक्रमात दीपप्रज्वलन करतेवेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, रमेश शहा, सीमा दाबके आदी.

७४१ : बावधन : दिव्यांग मुलांसाठी आयोजित ‘जल्लोष’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया.

९०९ : बावधन : गुणवान दिव्यांग मुलांसमवेत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, रमेश शहा, सीमा दाबके, प्रशांत पितालिया आदी.

९५२ : बावधन : दिव्यांग मुलांसाठी आयोजित ‘जल्लोष’ कार्यक्रमावेळी आकाशात फुगे सोडून मुलांनी आनंद साजरा केला. यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया, रमेश शहा, सीमा दाबके आदी.

Leave A Reply

Translate »