बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं कोल्हेंच टेन्शन.

शिरूर: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यामध्ये लढत होत आहे. येथे महाविकास आघाडी कडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात आहेत. कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार येथून मैदानात उतरवायला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते इकडेच दिसून आले. मात्र आता अजित पवारांनी शिरूरमध्ये सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केल्याने अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मी विकासावर बोलतो रडीचा डाव खेळत नाही

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत असताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला. हाच धागा पकडत अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला. “मी सुरुवातीपासून कार्यकर्त्यांना सांगत होतो की शेवटच्या सभेमध्ये रडीचा डाव खेळला जाईल. आज आमचा पट्टा रडला मात्र मी विकास कामांवर मत मागतो भावनिक राजकारण करत नाही”, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Translate »