एएसजी नेत्र रुग्णालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रम

पुणे:सुरक्षित प्रवास करण्यासाठी वाहनचालकांची दृष्टी चांगली हवी. यासाठी एएसजी नेत्र रुग्णालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांची जनजागृती करण्याबरोबर, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, दुचाकीस्वारांची रॅली असे कार्यक्रम पार पडणार आहेत. बुधवार दिनांक ११ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुढे मॉडर्न कॉलेज, जंगली महाराज रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रस्ता असा दुचाकी रॅलीच मार्ग आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकापासून सुरुवात होऊन कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड, शिवार गार्डन ते पुन्हा कोकणे चौक असा रॅलीचा मार्ग आहे.

या रॅलीमध्ये महाविद्यालयातील तरुणांच्या सहभागासह विविध सामाजिक संस्था आणि पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. सप्ताहादरम्यान वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी आणि संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांची मोफत नेत्रतपासणी केली जाणार आहे. बाईक रॅली दरम्यान सहभागींना हेल्थ कार्ड, कॅप, रिफ्लेक्टीव्ह सेफ्टी आउटडोअर जॅकेट, रिफ्रेशमेंट रुग्णालयातर्फे प्रदान केले जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रस्ता सुरक्षा सप्ताह ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान “रस्ता सुरक्षा जीवन रक्षा” या थीमसह साजरा केला जाणार आहे.

Leave A Reply

Translate »