पुणे – जगाच्या वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेत भारत हे एक आर्थिक डेस्टीनेशन आहे, जगातील विकसित देशांना मागे टाकून भारत वेगाने पुढे जात आहे, या मजबूत आर्थिक व्यवस्थेत अग्रवाल समाजाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज अग्रोदय महाधिवेशनच्या उद्घाटनप्रसंगी केले. अखिल भारतीय अग्रवाल परिषदेत राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गजानन कीर्तिकर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनूप गुप्ता, आयोजन समिती अध्यक्ष राजेश अग्रवाल, प्रख्यात उद्योगपती कृष्णकुमार गोयल (कोहिनूर ग्रुप), जयप्रकाश गोयल (गोयलगंगा ग्रुप), सुनील अग्रवाल (अध्यक्ष: चिंचवड अग्रवाल समाज), प्रेमचंद मित्तल, पवन श्रॉफ, प्रेरणा बिर्ला, अनुप गुप्ता, प्रसिद्ध प्रेरक वक्ते डॉ. उज्ज्वल पाटणी आदी उपस्थित होते. अखिल भारतीय अग्रवाल परिषदेत आज 24 डिसेंबर 2022 महालक्ष्मी डोली, महिला सम्मेलन, युवा सम्मेलन, व्यवसाय सम्मेलन, व्यवसाय/उद्योग भव्य प्रदर्शन लेगसी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्या रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी अगरवाल गॉट टॅलेंट एंटरटेनमेंट आणि मुख्य प्रांतीय परिषद आणि आगर पुरस्कारांचे वितरण + सोशल ओपन फोरम (चर्चा सत्र) होणार आहे.
